कुरुड – गावातील पोस्टमनची बदली होताच सावित्रीच्या लेकी झाल्या भावूक
पोस्टमनला सावित्रीच्या लेकिंनी दीला निरोप
देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील अविरत सेवा देणाऱ्या व गावातील गावकऱ्यांच्या मदतीला धावून येणाऱ्या पोस्टमनची अचानकरित्या बदली झाल्याने सावित्रीच्या लेकी भावूक होऊन गावातील पोस्टमनला निरोप दिला व पुढील वाटचलीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
कोंढाळा येथील पोस्टमन योगेश कोरडे यांनी सतत दोन वर्षे पोस्ट ऑफिस मधे कार्य केले.सदर कालावधीत केवळ पोस्ट ऑफिस पुरतेच मर्यादित न राहता गावकऱ्यांच्या मदतीला धावून येणे तर कधी ग्रामपंचायतीचा कार्यक्रम असो की ग्रामपंचायतीनी राबवण्यात आलेला स्वच्छता अभियान अशा उपक्रमामधे सहभाग घेऊन स्वतः हातात झाडू घेऊन गावात कार्य करीत होते.शाडो पंचायतच्या माध्यमातून शाळा बंद असताना विद्यार्थी यांना शिकवित जात होते व वेळेत पोस्टमन यांनी विद्यार्थी यांना मार्गदर्शन करीत होते . पोस्टमन म्हणून न ओळखता कोंढाळा गांवा मधे नावाने ओळखणारे योगेश कोरडे अशी त्यांची ओळख होती .अशा पोस्टमन यांची बदली होताच अनेकांचा मनात बसलेलं पोस्टमन यांचा सावित्री च्या लेकीनी गिफ्ट देऊन पोस्टमन यांना निरोप दिला .सदर निरोप समारंभ कार्यक्रम शाडो पंचायत यांनी घडवून आणला . यावेळी सरपंच अपर्णा राऊत , प्रदीप तुपट , निखिल गोरे, संदीप साबळे , शैलेश दुपारे, मनोज दुपारे , निलेश दुपारे, अजय भरे, खुशी चौधरी, मानसी चौधरी , श्रेया भजनकर, विभा भरे, शुभांगी झिलपे , देव्यांनी गुरणुले, मृणाल शेंडे , प्रतीक्षा मडावी , तनु राऊत हिमानी राऊत या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सूरज चौधरी तर वैष्णवी मेश्राम यांनी आभार मानले.
