✍️ देसाईगंज: मागील दोन टर्मपासुन भाजपाचे आमदार असलेल्या कृष्णा गजबे यांना भारतीय जनता पक्षाने तिसर्यांदा विश्वास दर्शवून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. दरम्यान, आज आमदार कृष्णा गजबे यांनी आपल्या जनादाराच्या जोरदार शक्तिप्रदर्शनात भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकार्यांच्या प्रमुख उपस्थितीत देसाईगंज उपविभागीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला
शहराच्या आदर्श महाविद्यालयापासुन काढण्यात आलेल्या रॅलीत हजारोच्या संख्येने भाजपा
पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आदी सहयोगी पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. Krushna Gajbe यावेळी सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, विधानसभा निरीक्षक श्रीनिवास, नागरी सहकारी बँकचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, विधानसभा महायुती समन्वयक प्रमुख किसन नागदेवे, प्रकाश सावकार पोरड्डीवार, कवाडे गटाचे मुकेश खोब्रागडे, भाजपा जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, शिवसेना जिल्हाध्यक्ष महिला आघाडी अर्चना गोंदोळे, जिल्हाध्यक्ष अनु. जाती मोर्चा अॅड. उमेश वालादे, राकाँचे किशोर तलमले, युनुस शेख, संजय साळवे, ज़िल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, शिवसेना जिल्हा उपप्रमुख नारायण धकाते, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजू जेठाणी, भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल पारधी, सचिन खरकाटे, भाजपा महिला जिल्हा महामंत्री प्रिती शंभरकर, माजी जिल्हा परिषद सदस्या रोशनी पारधी यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि महायुती कार्यकर्ताची उपस्थिती होती.