कौशिक अंबानीची सपत्नीक महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2023 साठी निवड
इंटरनेट शिवाय चालणाऱ्या ई-स्कॉलर ऍप्स च्या कार्याची दखल…
देसाईगंज (वार्ता) :-
कोरोना महामारीत मुलांना सर्वाधिक आवश्यक असलेल्या ऑनलाईन शिक्षणाची गरज पाहता देसाईगंज येथिल MCA चे शिक्षण घेतलेल्या कौशिक अंबानी यांनी विद्यार्थांना विना इंटरनेट शिवाय चालणाऱ्या ई-स्कॉलर नावाच्या ऍप्सच्या माध्यमाने शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. अल्पावधितच सदर ऍप्सने आपले उद्दिष्ट पूर्ण केल्याने ऍप्स चे संचालक कौशिक अंबानी व प्रियंका कौशिक अंबानी यांची महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2023 साठी निवड करण्यात आली.
वरील पुरस्कार दि. 29 जानेवारी 2023 ला हयात सेंट्रिक, जुहू – मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, विधानसभा सभापती राहुल नार्वेकर, महाराष्ट्राचे कौशल्य आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा आदींच्या प्रमुख उपस्थित देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे गडचिरोली सारख्या आदिवासी, नक्षलग्रस्त भागात ई-स्कॉलर फ्युचर ऑफ इंडिया या नावाची शैक्षणिक ऍप्स मागील वर्षी 26 जानेवारी 2022 ला च तयार करण्यात येऊन त्याचे रितसर आ.i कृष्णा गजबे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले होते. ई-लर्निंग शिक्षणातील सर्वोत्कृष्ठ स्टार्टअप एप्स असून ई-स्कॉलर टिमच्या अथक प्रयत्नाने हे यशोशिखर गाठल्याची प्रतिक्रिया ऍप्स चे संचालक कौशिक अंबानी यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.