देसाईगंज – गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी ओ.बि.सी. सेल, यांच्यामार्फत कुरूड येथील नुकतेच काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश केलेले श्री मनोज महादेवराव ढोरे यांची गडचिरोली ओबीसी सेल जिल्हा सचिव या पदावर ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन व पक्षासाठी केलेले कार्य, व जनसामान्यांसाठी, समाजाप्रती त्यांची तळमळ, पाहू जाता पक्ष संघटन मजबूत करण्याकरिता व जिल्ह्यातील ओबीसी बाधवांचे प्रश्न, समस्या, सोडविण्याकरीता, व सर्व पदाधिकारी यांच्याशी एकनिष्ठ राहून ढोरे यांची नियुक्ती केली आहे.
ढोरे यांनी आपल्या निवडीचे श्रेय महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी कॅबिनेट मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, गडचिरोली काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राम्हणवाडे, जेसाभाऊ मोटवानी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल, महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सहसचिव कुणालभाऊ पेंदोरकर यांना आपल्या निवडीचे श्रेय दिले आहे.
नंदुभाऊ नरोटे गडचिरोली काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष, गणेश फाफट मा. नगरसेवक, हरीश मोटवानी मा. नगरसेवक, सहजाभाई शेख, राजू बुल्ले तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी देसाईगंज, पिंकुभाऊ बावणे शहरध्यक्ष यू. काँ., अरुण कुंभलवार ओबीसी सेल तालुका अध्यक्ष, परसराम टिकले मा. तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी देसाईगंज, नितीनभाऊ राऊत तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष देसाईगंज, राजुभाऊ रासेकर ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते यांनी निवडीबद्दल ढोरे यांचे अभिनंदन केले आहे.
मनोज ढोरे यांची गडचिरोली जिल्हा ओबीसी सेलच्या सचिव पदी नियुक्ती झाल्याने जिल्हाभरातून अभिंनदनाचा वर्षाव केला जात आहे.
???????????????????