टी 6 वाघीण शंभर जणांचे बळी घेईपर्यंत वनविभाग तीची काळजी घेणार आहे काय?
गडचीरोली तालुक्यात T 6 वाघिणीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पोर्ला आणि चातगाव वन परिक्षेत्रामध्ये या नरभक्षक वाघिणीचा वावर आहे. आतापर्यंत हिने नऊ जणांचा बळी घेतला आहे. या वाघिणीला जेरबंद करण्याची मागणी होताच वनविभागाच्या पथकाने हिला जेरबंद करण्याची मोहीम हाती घेतली परंतु ही आपल्या चार पिल्लासह कॅमेऱ्या मध्ये कैद होताच पिल्लांच्या सुरक्षीततेसाठी तीला जेरबंद करण्याची मोहीम स्थगित करण्यात आली. पण या वाघिणीचे मनुष्यबळीं घेण्याचे सत्र थांबन्याचे नाव नाही.
मागच्याच आठवड्यात साठ वर्षीय महिलेचा बळी घेणाऱ्या या वाघिणीने आज पुन्हा पन्नास वर्षीय महिलेवर हल्ला करुन तीला गंभीर जखमी केले. ती सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. वाघिणीची आणि तीच्या पिल्लांची इतकी काळजी असणाऱ्या वनविभागाला मनुष्य हानी विषयी अजिबात संवेदनशीलता नाही काय? दहा वीस लाखांच्या रकमेचा चेक देऊन त्यांच्या जीवाची किंमत लावणाऱ्या असंवेदनशील सरकारचे सुद्धा या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. या वाघिणीने अजून शंभर बळी घेईपर्यंत वनविभाग गप्प राहणार काय??
या भागातील लोकप्रतीनिधी या प्रश्नावर सरकारला धारेवर का धरत नाही? मृतकाच्या घरी धनादेशाचे वितरण करताना मात्र हे आवर्जून उपस्थित राहतात..
वनविभागाचे ढिसाळ प्रशासन, . अकार्यक्षम लोकप्रतिनिधी, असंवेदनशील बहिरे शासन असल्यावर कायम दुर्लक्षित असणाऱ्या या भागातील जनतेला आपल्या जिवाभावाच्या माणसाला रक्ताच्या थारोळ्यात पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही??