✍️देसाईगंज : समाजातील अतिशय दुर्लक्षीत घटक म्हणजे दिव्यांग, आणि या दिव्यांगाल रोजगारभिमुख करण्या – साठी तसेच केंद्राकडून वाढीव मदतीसाठी येणा-या काळात नक्कीच काम करणार असल्याचे, राष्ट्रीय बहुउद्देशिय अपंग कल्याणकारी संस्था द्वारा आयोजीत राष्ट्रीय दिव्यांग टॅलेन्ट शो खा. नामदेवराव किरसान यांनी वडसा येथे प्रतिपादन केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश चौधरी (पो उपनिरिक्षक) वडसा, तर प्रमुख पाहुणे, मुन्ना महाजन (समाज सेवक), भगवानदास राठी (समाजसेवक) नागपूर तसेच प्रा. चंद्रशेखर बांबोळे, सुनिल गजघाटे, विजय बन्सोड, राजेन्द्र बुल्ले (अध्यक्ष ता काँग्रेन), अनिता मेश्राम, उषा किरण बन्सोड, लिना रामरे के अरविंद घुटके, आशिष घुरके आदींची उपस्थीती होती.
सदर दिव्यांग टॅलेन्ट शो मध्ये भंडारा, गोंदिया, सहित लगतच्या राज्यातील दिव्यांगानी या. शो मध्ये सहभागी होत आपल्या कलाकृतीचे, सुप्त गुणाचे उपस्थीत जनसमुदायासमोर उत्साहपूर्वक सादरीकरण केले, यावेळी “दिव्य्यांग बेस्ट कपल ” या पुरस्काराने संस्थेकडून यापूर्वी विवाह लावून देण्यात आलेल्या चार जोडप्यांचे सन्मान- चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
दिव्यांगाच्या क्षेत्रात भरीव कार्य करणा-या संस्थेच्या अध्यक्ष वर्षाताई नागर नांदगावे यांच्या मातापित्यांचा गौरव मा. खासदार नामदेव किरसान यांच्या हस्ते व्यासपिठावर कारण्यात आला,या कार्यक्रमात उत्कृष्ठ सुत्रसंचालन शामसुंदर बन्सोड, तर प्रास्ताविक वर्षा नांदगावे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. धोंगडे मॅडम यांनी केले