देसाईगंज-
नागपूर विभाग शिक्षक आमदार पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेले सुधाकर गोविंदराव अडबाले हे आपल्या प्रतिस्पर्धी नागो गाणार यांना ९ हजार ५०० मताच्या फरकाने मात करून बहुजनांच्या एकतेचे फलित म्हणून विजयी झाल्याने देसाईगंज तालुका महाविकास आघाडीच्या वतिने येथील राष्ट्रीय महामार्गावर फटाके फोडून विजयी जल्लोष साजरा केला.
यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते परसराम टिकले,गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नंदु नरोटे,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,देसाईगंज शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष पिंकु बावणे, सामाजिक कार्यकर्ते छगन शेडमाके,शिवसेनेचे नंदु चावला,राष्ट्रवादीचे विलास गोटेफोडे,मनोज ढोरे,माजी नगरसेवक भीमराव नगराळे,बालाजी ठाकरे, ज्ञानदेव पिलारे,जग्गी परसवाणी,शिक्षक संघाचे विलास पुस्तोडे,माणिक पिलारे,अरुण राजगीरे,वसंत गोंगल, पुरुषोत्तम उरकुडे,हंसराज लांडगे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते,
पदवीधर शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेले सुधाकर अडबाले यांना संभाजी ब्रिगेड,भारतीय कम्युनिस्ट पार्टी(मार्क्सवादी)
इत्यादी राजकीय पक्ष आणि
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना,विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन (विजूक्ता),नागपूर विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन,
गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन,नूटा, आयटीआय निदेशक संघटना,
एमसीव्सीसी संघटना,विदर्भ कला शिक्षक संघ,महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ,विदर्भ शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य नगरपरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ,विभागीय अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती आश्रम शाळा कर्मचारी संस्कृती संघटना,
खाजगी प्राथमिक शिक्षक संघ,जि.वर्धा,खाजगी प्राथमिक शिक्षक संघ, (म.रा.) भशाखा जि.भंडारा, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ, नागपूर विभाग (प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ)आदी संघटनांचा पाठिंबा होता.अडबाले यांचा विजय हा समस्त बहुजनांच्या एकिचा विजय असल्याचे सांगितले जात आहे.अडबाले यांच्या विजयामुळे येत्या निवडणुका विरोधकांना सावधानतेचा इशारा असल्याचे यामुळे बोलल्या जात आहे.