✍️देसाईगंज :-
देसाईगंज नगर परिषदे अंतर्गत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक सांस्कृतिक भवनात पार पडले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थी द्वारा एकलनृत्य, समूहनृत्य, पथनाट्य, समुहगान, ईत्यादी कार्यक्रमांचे /उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये नगर परिषदेच्या एकुण ८ शाळांनी सहभाग घेतला होता. यात नगर परिषद प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड या़नी प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक नप प्राथमिक शाळा जुनी वडसा तर तृतिय क्रमांक नगर परिषद कन्या शाळा यांनी पटकवला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी डाँ. कुलभूषण रामटेके, तर प्रमुख अतिथी म्हणून कार्यालय अधिक्षक महेश गेडाम , नगर रचनाकार दानिशोद्दीन काजी ,कनिष्ठ अभियंता साई कोंडलेकर,मंगेश नाकाडे,आशिष गेडाम,मंगेश बोंद्रे,सहायक प्रकल्प अधिकारी लवकुश उरकुडे, से.नि.लेखापाल हरगोविंद भुर्रे, कोंडकावार मँडम ई. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख अंबाजी आमनर यांनी केले. तर सुत्रसंचालन मिनाक्षी शालिग्राम यांनी केले.
या कार्यक्रमांचे यशस्वीतेकरीता नगर परिषद शाळेतील सर्व मुख्याध्यापक,कल्पना पत्रे ,किशोर चव्हाण, आशा नाकाडे, संध्या लांजेवार , मंगला सहारे, बाळकृष्ण मेश्राम, शमीना शेख व सहाय्यक शिक्षक राहूल मस्के,राजेश मडावी, शोभा साखरे,खेमराज तिघरे,देवलाबाई पेंद्राम, रामेश्वर मेंढे, मुजाहिद पठाण,मिना कुमोटी,अंताराम कापगते,वाल्मीक कामगते,मिनाक्षी शालिग्राम,तसनिम खान, मजहर बानो,वंदना उसेंडी, ईश्वर गहाणे,मोहन गहाणे व शाळेतील कर्मचारी वर्गानी परिश्रम घेतले.