देसाईगंज नगर परिषेदेतील जलतरण तलाव गेल्या दोन वर्षांपासून बंद ठेवण्यात आल्याने तलावाची मोठी प्रमाणावर दुर्दशा झाली आहे. बंद असलेल्या या तलावामुळे जलतरणपटूंची गैरसोय होत आहे. त्यामुळे बंद तलाव त्वरित सुरू करण्याची मागणी शहरातील क्रीडापटूंकडून होत आहे
जलतरणाकरिता महत्त्वाचा सीजन असलेला फरवरी,मार्च जवळ आला आहे; मात्र देसाईगंज शहरात एकमेव असलेला जल तरणतलाव अद्याप दुरुस्त केला नाही. प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली केल्या गेल्या नाहीत.तरण तलाव कधी सुरू होणार आहे, असा सवाल जलतरणपटू व सामाजिक कार्यकर्ते सुशील केशवानी विचारत आहेत।या तलावामध्ये खास उन्हाळयात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी तर काही ॲकॅडेमीकडून स्पर्धेसाठी येत असतात देसाईगंज शहरातील साधारण दोन तीनशे नागरिक दररोज या जलतरण सुविधेचा लाभ घेतात 60ते 70 लाख खर्च करूनही दोन ते तीन वर्षापासून जलतरण तलाव बंद आहे।नगरपरिषेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जलतरण तलावाची व बगीच्याची ही अवस्था आहे।देसाईगंज शहरातील एकमेव जलतरण तलाव लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकता सुशील केशवानी यांनी केली आहे।

,?????????????????????????????????????

