✍️देसाईगंज- २०१४ मध्ये तत्कालीन युपिए सरकारच्या काळात ४०० रुपयाला घरगुती गॅस सिलिंडर मिळत असताना विद्यमान सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी महागाईचा ढोल पिटण्यासह मातब्बर महिला नेत्यांनी चक्क सिलिंडर घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते.माञ तेच आता सत्तेत असताना गॅस सिलिंडरचे दर सर्व सामान्य गोरगरीबांच्या आवाक्याबाहेरचे झाले असतानाही ऐन होळीच्या पर्वावर ५० रुपयाची दरवाढ करण्यात आली आहे.यामुळे होळी सारखा सण चुलिवर साजरा करण्याची वेळ आल्याने केंद्र शासनाच्या गॅस दरवाढीचा जाहिर निषेध करत देसाईगंज तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आरती लहरी यांच्या नेतृत्वात शहराच्या फवारा चौकात चुलिवर भाकरी शेको आंदोलन करून गॅस दरवाढीच्या विरोधात केंद्र शासनाचा जाहिर निषेध करण्यात आला. जंगलांची वारेमाप तोड थांबविण्यासाठी कुऱ्हाडबंदी, निर्धुर चुल,धुरमुक्त गाव संकल्पना अस्तित्वात आणुन तत्कालीन युपिए सरकारने गोरगरीबांना परवडेल अशा माफक दरात गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यासोबतच प्रती गॅस सिलिंडर सबसिडी दिली होती.पर्यावरणाचा समतोल राखुन गावे धुरमुक्त व महिलांना धुराचा ञास होणार नाही अशी त्यामागची धारणा होती.माञ विद्यमान सरकारने अनेक लोकांना गॅस सबसिडी सोडायला भाग पाडुन वर्तमान स्थितीत गोरगरीबांना ४२.९२ रुपये प्रती सिलिंडर सबसिडी देऊन गॅस दरवाढीचा सपाटा लावला आहे. केवळ ९ वर्षाच्या कार्यकाळात नागरिकांना दिलासा देण्याऐवजी सातत्याने गॅसच्या किंमतीत दरवाढ करून ४०० रुपयाला मिळणारा गॅस सिलिंडर १ हजार १८० रुपयावर आणुन ठेवला आहे.८० करोड गरीब नागरीक एकवेळच्या अन्नासाठी शासनावर अवलंबून असताना मोफत मिळणारे तांदुळ १ हजार १८० रुपयाच्या गॅसवर शिजवू शकत नसल्याने जेवण चुलिवर तयार करणे क्रमप्राप्त ठरू लागले आहे.अच्छे दिन चे स्वप्न दाखवून परत धुरांड्यात स्वयंपाक करण्याची वेळ आणल्याने अशा जुमलेबाज सरकारचा यावेळी जाहिर निषेध करत फवारा चौकात चक्क चुलिवर भाकरी शेको आंदोलन करून गॅस दरवाढीच्या विरोधात जाहिर निषेध करण्यात आला. गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नंदु नरोटे,आदिवासी जिल्हा सचिव दिलीप घोडाम व काँग्रेस कार्यकर्ते पिंकु बावणे,नरेश लिंगायत यांच्या मार्गदर्शनात देसाईगंज तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आरती लहरी यांच्या नेतृत्वात भाकरी शेको आंदोलन करून जाहिर निषेध केला.यावेळी आमगावच्या सरपंचा रुपलता बोदले,अनुसूचित जाती सचिव समिता नंदेश्वर,विमल मेश्राम, मनिषा तेठे,आशा कुर्वे,अनिता चौधरी,सोनल घोरमोडे, उर्मिला सोडरकार,लीलाबाई सिधमवार,जयाबाई रामटेके आदी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी,कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
✍️ गडचिरोली: नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...
गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...