✍️ गडचिरोली: देसाईगंज…..दत्ता मेघे उच्चं शिक्षण व संशोधन संस्था द्वारा संचालित. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे )
नागरिक आरोग्य रक्षक संस्था, केयर क्लिनिक, अम्मा क्लिनिक, लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था देसाईगंज यांच्या संयुक्त विद्यमाने देसाईगंज कमलनगर येथील रफी अहेमद किडवाई मेमोरीयल हायस्कुल येथे भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबीर चे आयोजन करण्यात येणार आहे या शिबिरामध्ये, रक्तदाब, ब्लड शुगर, बरेच दिवसचा ताप, किडनीचे आजार, हृदय रोग, अशक्त पणा, वारंवार चक्कर येणे, जुनाट हृदय रोग, छातीत दुखणे, धाप लगणे, छातात धडधड, करणे इत्यादी,नेत्र रोग मोत्या बिंदू शस्त्रक्रिया , तीळळेपणा, इत्यादी,
हायद्रोशील,हर्निया,अंगावरील गाठी, आतड्यांचे आजार मुतखडायचे आजार, पोटाचे आजार, गलगंड (थायराईड)इत्यादी,स्त्री रोग,मासिक पाळीचे आजार, पांढरे पाणी जाने, महिलांचे इतर आजार,बाल रोग हृदयाला छिद्र असणे, मतिमंद, मुलांच्या विकासा संबंधी, आजार तसेच कुपोषण, लहान मुलांचे सर्व आजार,अस्थीरोग, संधिवात, मणक्यात असणारी ग्याप, वाकलेले पाय, फ्रॅक्चर तसेच हदांचे सर्व आजार,त्वचा रोग खाज, गचकरण, अंगावरील पांढरे डाग, त्वाचेचे सर्व रोग,श्वासन रोग,दमा, बरेच दिवसचा खोकला, तोंडावाटे पडणारे रक्ताचे ठसे इत्यादी सर्व रोगाची तज्ञ् डॉक्टर कडून तपासणी व उपचार करण्यात येईल, या शिबिरामध्ये निवड झालेल्या रुग्णांची हेल्प एज इंडिया च्या वतीने मोफत मध्ये सश्त्रक्रिया करण्यात येईल, करिता या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असे आव्हान आयोजक लतीफ भाई शेख, राजेश गढरिया, नवेद पटेल, योगेश नेवारे, लतीफ रिजवी, मछिंद्र मुळे, अजमत खान, जावेद शेख आदिनी केले आहे