✍️: देसाईगंज: देसाईगंज च्या श्रेयश चंद्रकुमार दुबे ( दुबे महाराज ) या मुलाचे अपहरण करुन नेत असतांना बल्लारशहा येथे संशय आल्याने जावेद शेख नामक ईसमाच्या सतर्कतेमुळे डाव फसला । जावेदने मुलाला वाचवुन रेल्वे पोलिसांच्या स्वाधिन केले, अपहरन कर्ते तिन ते चार जण असुन श्रेयश हा १२ वर्षाचा मुलगा असुन सायंकाळी ४ चे सुमारास सायकल ने ट्युशन ला जात असतांना त्याला गुंगीचे षध देवुन अपहरण करण्यात आले ।
सद्या मुलगा बल्लारशहा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असुन चंद्रकुमार दुबे नरेशभाऊ विठ्ठलानी व मिञ परिवार मुलाला आनण्यासाठी बल्लारशहा ला रवाना झाले आहेत..