देसाईगंज:वाचाल तर वाचाल असे नेहमी बोलले जाते. पण गेल्या काही वर्षांपासून वाचन संस्कृतीचे जतन करणार्या ग्रंथालयांची दुरवस्था झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहेत. आज या वाचनालयात वाचकांचे पाय वळविण्यासाठी अनेक उपाय योजना राबविल्या जातात. पण मोबाईल आणि सोशल नेटर्किंग साईटच्या अतिरेकामुळे अनेक ग्रंथालये निशब्द झाली आहेत. वर्षांनुवर्षे याठिकाणी असलेल्या पुस्तकांचे जतन करणे सध्या जिकिरीचे झाले असून यासाठी अर्थसहाय्य नसल्याने त्यांचीदेखील दुरवस्था झाल्याचे चित्र ग्रंथालयात दिसून आले आहे वाचनामुळे ज्ञानात भर पडते. ग्रंथालय हे सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक असून मोफत ग्रंथालयसेवा मिळणे हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. सर्वांगीण विकासासाठी ‘ वाचाल, तर वाचाल’ संदेश लक्षात ठेऊन गावागावात वाचनालये तयार केली गेली पाहिजे,देसाईगंज शहराततील हुतात्मा स्मारकची नवीन इमारतिचे लवकरात लवकर काम करून वाचनालय चालू करण्यात यावा असी मांग देसाईगंज शहरातील विद्यार्थी करीत आहेत.
ओ*गडचिरोली - वैनगंगा नदीपात्रात ठिय्या आंदोलन!*
गडचिरोली, दि. ५ एप्रिल – वैनगंगा नदीपात्रात गोसेखुर्द धरणाचे पाणी तातडीने सोडावे, या प्रमुख मागणीसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या...
गडचिरोली, २ एप्रिल २०२५ :: माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या अथक पाठपुराव्याला यश आले असून, त्यांच्या मतदारसंघातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी तब्बल ३...