दिनाक: 06 ऑगस्ट 2023
✍️देसाईगंज:
गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे असलेल्या वडसा रेल्वेस्थानकाच्या अद्ययावतीकरण कामाचे उद्घाटन आज दि. ६ ऑगस्ट २०२३ ला देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी वडसा रेल्वे स्थानक येथे प्लॉट फार्म नंबर २ वर रेल्वे नागपुर विभागाच्या वतीने हजारो नागरिक बसतील असे भव्य पेंडालची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वप्रथम रेल्वे विभागाच्या वतीने स्वागतगिताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी मंचावर चिमुर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. कृष्णा गजबे, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी न.प. उपाध्यक्ष तथा भाजपा जिल्हापाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, अप्पर मंडळ रेल प्रबंधक अशोक सुर्यवंशी, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा निवडणुक प्रमूख किसन नागदेवे, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, माजी नगराध्यक्ष शालुताई दंडवते, शहरातील व्यापारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती, डॉक्टर्स, प्रतिष्ठीत नागरिक, पत्रकार, शालेय विद्यार्थी, शिक्षक/शिक्षीका तसेच शासकीय/निमशासकीय कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ, शाल, भेटवस्तू देऊन अप्पर मंडळ रेल प्रबंधक अशोक सुर्यवंशी यांनी स्वागत केले.
वडसा रेल्वे स्थानकाजवळील भुमिगत पुलात साचत असलेल्या पाणी समस्येचे यथाशिघ्र निराकरण करण्यात यावे व वडसा रेल्वे स्थानकातून गोंदिया-बल्लारशाह मार्गे धावणाऱ्या सर्वच सुपरफास्ट रेल्वेचे थांबे वडसा रेल्वे स्थानकावर देण्याच्या मागणीकडे अप्पर मंडल रेल प्रबंधकाचे लक्ष वेधले तसेच वडसा स्थानकाचे होत असलेले कायापलट हे क्षेत्रातील जनता व प्रवाशांना सुखदायक ठरेल असा आशावाद आमदार गजबे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात देसाईगंज येथील महात्मा गांधी विद्यालय आदर्श इंग्लिश हायस्कुल, नागपुर मंडळ स्काऊट गाईड चे विद्यार्थी यांनी विविध देशभक्ती, आदिवासी, नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.