Friday, January 17, 2025
Homeदेसाईगंजपत्रकारास शिवीगाळ व पाहून घेण्याच्या धमक्या देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल….

पत्रकारास शिवीगाळ व पाहून घेण्याच्या धमक्या देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल….

  • #✍️कोंढाळा✍️देसाईगंज :- तालुक्यातील कोंढाळा वैनगंगा नदी घाटातील व इतर गौण खनिजांच्या शासनाच्या संपत्तीला चुना लावणाऱ्या व अवैधरीत्या तस्करी करणाऱ्यांविरोधात ‘उद्रेक न्युज’ पोर्टल चे संपादक तथा ‘विदर्भ की दहाड’ चे प्रतिनिधी सत्यवान रामटेके यांनी वारंवार अवैध तस्करी विरोधात शासनाच्या चोरी होणाऱ्या खनिज संपत्ती विषयी आळा घातला जावा; याकरिता बातम्यांच्या माध्यमातून आपली छाप पाडली.अशातच अवैध रेती उपसा बाबत बातम्या प्रसारित केल्याने गावातील काही गुंड प्रवृत्तींच्या व्यक्तिंद्वारे ‘रेतीच्या बातम्या कशाला प्रकाशित करतो’ म्हणून शिवीगाळ व पाहून घेण्याच्या धमक्या दिल्याने अखेर देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे.
    कोंढाळा वैनगंगा नदी घाटातून बऱ्याच महिन्यांपासून शासनाच्या खनिज संपत्तीची अवैधरीत्या रेती वाहतूक केली जात आहे.शासनाच्या खनिज संपत्तीच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी बातम्या प्रसारित केल्याने कोंढाळा वैनगंगा नदी घाटातील मेंढा घाट, सिंदराई घाट व नव्याने सुरू करण्यात आलेल्या घाटांवर महसूल विभाग खळबळून जागे होऊन अवैधरीत्या रेती तस्करीवर चाप बसविण्याकरीता खड्डे मारण्यात आले.मात्र हल्ली पिंपळगाव वैनगंगा नदी घाटातून मोठ्या प्रमाणावर शासनाच्या खनिज संपत्ती असलेल्या रेतीची अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याने ‘उद्रेक न्युज’ पोर्टल चे संपादक तथा ‘विदर्भ की दहाड’ चे प्रतिनिधी सत्यवान रामटेके यांनी बातम्या प्रसारित करून सदर प्रकरण उजेडात आणण्याचा प्रयत्न केला असता,कोंढाळा गावातील अक्षय राऊत (२६),संतोष धोटे(२९) व भास्कर धोटे(३६)यांनी धमकीवजा बोलणी करून शिवीगाळ केली. लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ गणल्या जाणाऱ्या पत्रकारास दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.अन्यथा गुंड प्रवृत्तींच्या मनोविकृतांची दादागिरी आणखी वाढतच जाणार असल्याने अशांवर आवर घालणे गजेचे असल्याने
    भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ५०६ अंतर्गत देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

48 नक्षलवाद्यांनी लॉयड्स मेटल्समध्ये काम करून नवीन मार्ग शोधला

✍️ गडचिरोली:  नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...

गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांनी गांधी चौकातून बाईक रॅली च्या माध्यमातून मुक मोर्चा काढला.

गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...

Recent News

Most Popular

Recent Comments