✍️देसाईगंज येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या जल्लोशात व उत्साहात साजरी करण्यात आली देसाईगंज च्या विविध वार्डातुन डॉ बाबासाहेबांचा जयघोष करत रैलिंचे आगमण दिक्षाभुमीवर झाले देसाईगंज शहरात नव्यानेच तयार झालेल्या बौद्ध समाज कोअर कमेटी ने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या निमित्याने वितरित केलेला अल्पोपहार समाज बांधवांसाठी लक्षवेधी ठरले दिक्षाभुमीकडे येत असलेल्या रैलींचे स्वागत करुन कमेटी च्या सर्व सदस्यांनी येणार्या सर्व बंधुभगिनींना अल्पोपहार चे वितरण करुन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन दिली या प्रसंगी बौद्ध समाज कोअर कमेटी चे मार्गदर्शक विजय बन्सोड अशोक बोदेले अड् बाळकृष्ण बांबोळकर इंजि नरेश मेश्राम कमेटी अध्यक्ष प्रकाश सांगोळे हंसराज लांडगे कुशाबराव लोणारे डाकराम वाघमारे भिमराव नगराळे मिना शेंडे द्रोपदी सुखदेवे कविता निरांजने टिना ठवरे कल्पना वासनिक सुरज ठवरे साजन मेश्राम उद्धवराव खोब्रागडे विलास लोखंडे यांचेसह कोअर कमेटी चे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते ।