मैराथन स्पर्धा संपन्न
देसाईगंज,
# स्व. रामचंद्र जेठानी मेमोरियल ट्रस्ट, देसाईगंज संचालित यशोदादेवी इंग्लिश मिडीयम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व किड्स होम ए प्ले स्कूल, देसाईगंज यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील विद्यार्थ्यांची ५ किमी मैराथन स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री मोतीलाल जेठानी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सहसचिव श्री विनोद जक्कनवार, सदस्या श्रीमती सुनीता जेठानी, श्री रासेकर सर उपस्थित होते.
विद्यार्थी गटात अश्र्वत रामटेके याने प्रथम क्रमांक पटकावला, झिशान शेख याने द्वितीय क्रमांक तर साहिल कोहळे याने तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थीनी गटात साक्षी नाकडे हिने प्रथम क्रमांक पटकावला, साक्षी पील्लारे हिने द्वितीय क्रमांक तर शेजल नाकाडे हिने तृतीय क्रमांक पटकावला. सर्व विजेत्यांचा संस्थेच्या वतीने पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य श्री देशपांडे सर, श्री बोरकर सर यांच्या मार्गदर्शनात सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.