देसाईगंज:देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा युवा वीर मराठा मंडळातर्फे येत्या १९ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज २९ जानेवारी पासूनच जय्यत तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. येणाऱ्या जयंती दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धांचे आयोजन करून 18 फेब्रुवारीला बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याने आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास विद्या निकेतन लोकमान्य टिळक शाळेत विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या .स्पर्धेच्या सुरुवातीला गावातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विविध स्पर्धेस सुरुवात करण्यात आली.येत्या १८ फेब्रुवारी ला वेशभूषा स्पर्धा,धावण्याची स्पर्धा , नृत्य इतर स्पर्धा व 19 फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त महिला करीता रांगोळी स्पर्धा व भव्य मिरवणूक आयोजित करण्यात येणार असल्याचे युवा वीर मराठा मंडळाचे नितेश पाटील कळविण्यात आले आहे. घेण्यात आलेल्या स्पर्धे दरम्यान ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा नितिन राऊत, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनील पारधी , शाळेचे माजी मुख्याध्यापक देवराव भोस्कर सर,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार, पंढरी नखाते,प्रदीप तुपट सर, प्रा. पंकज धोटे सर , निखिल गोरे एन. आय आर. डी यंग फेलो , संदीप साबळे कैवल्य एज्युकेशन फाउंडेशन समन्वयक , सूरज चौधरी प्रथम फाउंडेशन जिल्हा समन्वयक ,जयंत दुपारे आशिष दोनाडकर, नंदू बेहरे, अतुल वनस्कार, विवेक राऊत , विकास राऊत ,अक्रोश शेंडे , छत्रपती ढोरे, मदन पचारे , तारकेशवर झिलपे, विकास मोहूर्ल , अजय भर्र , गावातील विद्यार्थी, युवा वीर मराठा मंडळातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.येत्या १८ व १९ फेब्रुवारी रोजीच्या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

