देसाईगंज:अग्रवाल बंधू उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित
मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान…
देसाईगंज
येथिल मायश्री राईस इंडस्ट्रीज चे संचालक श्री आकाश व रोहित अग्रवाल यांना आज दि. 28 जानेवारी 2023 ला मुंबई येथिल सेंट रेजिस हॉटेल, लोअर परळ येथे न्युज 18 लोकमत द्वारा आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उद्योग विरहीत जिल्ह्यात राईस मिलच्या माध्यमातून शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या अग्रवाल बंधूंना हा त्यांच्या मिलची क्षमता व त्यांचे तांदुळ विदेशात जात असल्याने विशेष म्हणजे याच माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देत असल्याने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली
