विधानभवनावर आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष प्रकाश जिवानी यांच्या नेतृत्वात धडकला मोर्चा
वडसा शहरातुन मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वडसा येथून आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जिवानी यांच्या नेतृत्वात नागपूर येथील अधिवेशनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सामील झाले.
आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्ह्यातील विविध मागण्यांचे समस्या घेऊन आम आदमी पार्टीच्या वतीने विधीमंडळावर धडक दिली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली येथे होत असलेला विकास पाहुन गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वडसा येथे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जिवानी यांच्या नेतृत्वात आत्तापर्यंत हजारो जणांनी आम आदमी पार्टीत पक्ष प्रवेश केला आहे.
देसाईगंज वडसा परिसरात अनेक समस्या असुन आम आदमी पार्टी जिल्ह्यात निवडून आल्यास खरोखरच दिल्ली सारखा जिल्ह्याचा विकास होईल या हेतूने देसाईगंज वडसा परिसरातील नागरिक आम आदमी पार्टीत पक्ष प्रवेश करुन आम आदमी पार्टीची ताकद वाढवून दिल्याचे पहावयास मिळत आहे.
परिसरातील असलेल्या समस्या उपाध्यक्ष प्रकाश जिवानी यांनी नागरिकांना समजावून सांगितले व आपण नागपूर येथे होत असलेल्या अधिवेशनात आपल्या जिल्ह्यातील समस्या मांडून निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत परिसरातील नागरिकांसमोर मांडले असता परिसरातील शेतकरी,व नागरिकांकडून नागपूर येथे अधिवेशनात समस्या मांडण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत येणार असल्याची संमती दर्शवली असता जिल्हा उपाध्यक्षांनी शेकडो नागरिकांना घेऊन विधीमंडळात आपल्या जिल्ह्यातील समस्या मांडल्या यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जिवानी,शहर अध्यक्ष आशीष घुटके नवैद शेख़,भरत दलानी, तबरेज ख़ान, आंचल,सोनल, यांच्या समवेत देसाईगंज वडसा परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते