देसाईगंज:विविध मागण्यांचे देसाईगंज नगर परिषदला आप चा महा निवेदन
१. आदर्श शाळा मेन रोड जवळून गोविंद राईस मिल बिसा मुंडा चौक पर्यंत एकही स्ट्रीट लाईट नसून संध्याकाळी सदर रस्त्यावरुन जातांना अतिशय भयावह अंधार असतो. कृपया त्वरीत लावण्याची व्यवस्था करावी.
२. लाखांदूर टी पॉईंट ला राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात यावे. सदर चौकातून चंद्रपूर, भंडारा व गोंदीया अशा तीन जिल्हयांमध्ये वाहतूक जोडली गेली आहे.
३. विर्शी हेटी टी पॉईंटला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे नामकरण करण्यात यावे. ४. देसाईगंज बस स्टॉप, फवारा चौक, भाजी मार्केट या परिसरात मोठ्या प्रमाणात जनतेची वर्दळ असते मात्र या तिनही ठिकाणी शौचालय अथवा मुतारीची व्यवस्था नसल्याने लोकांना व महिलांना उघडयावर आजूबाजूला जावे लागते. ही बांब अतिशय दुर्देवी असून त्वरीत या तिनही ठिकाणी अयावत शौचालय आणि मुतारीची व्यवस्था करण्यात यावी.
डॉ. आंबेडकर शाळेसमोरील रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करण्यात यावे. रस्त्यांची हालत अतिशय दुर्जर झाली असल्याने शाळकरी मुलांचा अथवा कोणत्याही आम नागरीकाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देसाईगंज येथे क्रिडा संकूल व जलतरण तलाव लवकरात लवकर सुरु करण्यात यावे अशी मागणी क्रिडा प्रेमींची आहे.
७. भुमीहीन जनतेस व वडसा येथील किरायाने राहात असलेल्या आम नागरीकास हक्काची जागा व घरकूल मिळवून देण्यात यावे.
८. देसाईगंज शहरातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना नियमीत करुन पगारवाढ व पेंशन लागू करण्यात यावे. ९. गेस्ट हाऊस पासुन आफीस पर्यंत अवास्तव वाढलेल्या झाडांची छाटणी करणे तसेच झेन लॉन समोरील नालयांची साफसफाई करणे.
९. गेस्ट हाऊस पासुन आफीस पर्यंत अवास्तव वाढलेल्या झाडांची छाटणी करणे तसेच झेन लॉन समोरील नालयांची साफसफाई करणे
१०. स्मशानभूमी येथे बोरींग व नळ कनेक्शन देऊन २४ तास पिण्याचे पाण्याची सोय करुन देण्यात यावी. ११. हनुमान वार्ड, राजेंद्र वार्ड, कस्तुरबा वार्ड,विर्शी वार्ड रेल्वे लाईनच्या बाजूने पाण्याची टाकी बसविण्यात यावी
१२. आरमोरी रोड लगत हरजीत गोडाऊन जवळून नैनपूरला जाणारा रस्ता पूर्णपणे बंद आहे तो दुरुस्त
करुन सुरु करण्यात यावा,
१३. रहवासी दाखला फी ५० रुपये ऐवजी १० रुपये तसेच नमुना ८ करीता २०० ऐवजी १०० रुपये करण्यात यावे.
१४. गेस्ट हाऊस पासून २०० मि. काम थांबलेले आहे तो पर्यंत मधला मार्ग सुरु ठेवण्यात यावा.
१५. मार्केट लगत असलेला टुटेजा चौक रोशन मोबाईल गॅलरी जवळ चार गतीरोधक बसविण्यात यावे.
१६. नगर परिषद जवळ सांस्कृतिक भवन लवकरात लवकर सुरु करण्यात यावे.
१७. किदवाई वार्ड व जवाहर वार्ड परिसरात संयुक्त ग्रंथालय सुरु करण्याबाबत.
१८. फवारा चौकात सौंदर्यीकरण करून वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था, महिला व पुरुषांसाठी शौचायल व
मुतारी ची व्यवस्था करण्यात यावी.
१९. देसाईगंज शहरातील सर्व धार्मिक स्थाळांवर सरकारी नळ बसण्याच्या खुर्ची, मोठे लाईट लावून
सौंदर्यीकरण करण्यात यावे. २०. फवारा चौकातील तोडण्यात आलेल्या दुकानदांना पूनर्वसन करून देण्यात यावे
२१. भगतसिंग वार्ड ते नैनपूर रोड पंधरा वर्षापासून बनविण्यात आला नाही त्याचे काम करण्यात यावे. २२. मटन मार्केटमध्ये गाळे दुरुस्ती करुन मोठे लाईट, पाणी प्याऊ व रस्त्यांची व्यवस्था करण्यात यावी.असे विविध मागण्यांचे निवेदन देसाईगंज नगर परिषद ला आज आम आदमी पार्टी देसाईगंज च्या वतीने प्रकाश जीवानी आप गडचिरोली उपजिल्हा अध्य्क्ष यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले निवेदन देताना आम आदमी पार्टी देसाईगंज चे तालुका अद्यक्ष भरत दयलानी,शहर अद्यक्ष आशीष घुटके, सलाहगार दीपक नागदेवे,तबरेज खान, प्रमोद दहिवले, सौरव सहारे,अतुल ठाकरे, डॉक्टर सोनपुरे,बारकृष्ण भंडारकर, शिल्पा बोरकर, सागर मेश्राम, देवा जांभुळकर, सिद्धार्थ गनवीर वामन पगारे,जावेद शेख, सुशील केशवानी व आप देसाईगंज चे अनेक कार्यकर्ता उपस्थित होते
