✍️देसाईगंज:देसाईगंज शहरात, आजकाल पावर प्लांट मधून निखणारे राखर ने भरलेले ट्रक फुल स्पीड ने देसाईगंज शहरातून जाताना दिसतात, ही वाहने ब्रेक न लावता पूर्ण वेगाने शहरातून निघताना दिसतात, या वाहनांमध्ये उडणारी राखर संपूर्ण शहरातील नागरिकांच्या डोळ्यात अंजन घालत आहे. उडणारी राखर लोकांच्या डोळ्यात जाते हे या वाहनांच्या चालक आणि मालकाला माहीत आहे आणि नागरिक वाहन थांबवून लढू शकतात, म्हणून त्यांनी आधीच नियोजन केले आहे, कोणी मेले तरी ते थांबणार नाहीत. वाहने बहुतांशी रात्रीच्या वेळी दिसतात,
काल रात्री अचानक देसाईगंजच्या वैनगंगा नदीवर राखेने भरलेले एक वाहन सुसाट वेगाने जात होते, त्याच नदीच्या पुलावर ५ ते ६ मोटारसायक सवार नागरिकांचा डोळ्यात ही राखर गेली व अचानक त्यांची गाडी खाली कोसळली नागरिकांना समोरून काहीही दिसत
नव्हते, त्यामुळे मोटारसायकल घसरून त्याच जागी पडली, सुदैवाने मोठा अपघात झाला नाही, मोटार सायकलस्वारही वैनगंगा नदीत पडू शकले असते, अशात एक प्रकारे नागरिकांचा संताप दिसून येत होता, काही लोकांनी ट्रकचा पाठलाग केला, मात्र ट्रक कोणाला दिसत नव्हता एवढा वेग होता.या राखेने भरलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी देसाईगंज शहरातील नागरिकांनी केली आहे.