Friday, May 16, 2025
Homeदेसाईगंजसंत निरंकारी मंडळा द्वारे 25 एप्रिल ला देसाईगंज (वडसा) येथे भव्य रक्तदान...

संत निरंकारी मंडळा द्वारे 25 एप्रिल ला देसाईगंज (वडसा) येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

देसाईगंज :- स्थानिय संत निरंकारी मंडळाचे शाखे द्वारे दिनांक: 25 एप्रिल 2025 रोज शुक्रवारला सकाळी 9.00 ते दु. 3.00 वाजे पर्यत देसाईगंज (वडसा) येथील आरमोरी रोड वरील संत निरंकारी सत्संग भवन येथे सत्गुरू बाबा गुरुबचनसिंगजी महाराज व अन्य हुतात्म्यांच्या स्मृती निमित्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यांत आलेले आहे.

सदगुरू माता सुदिक्षा जी महाराज यांचे प्रेरणेने जिल्हयातील सर्व साधारण गोर गरीब रुग्णांना रक्त टंचाई होऊ नये म्हणून जिल्हा रक्त पेढी, जिल्हा रूग्णालय, गडचिरोली यांचे विनंती नुसार संत निरंकारी मंडळा द्वारे जिल्हयात विविध ठिकाणी स्थानीय शाखे द्वारे रक्तदान शिबीराचे आयोजन करून मानव सेवेचे कार्य केले जाते. देशात तसेच जिल्हयात रक्तदान करण्यांत संत निरंकारी मंडळ अग्रस्थानी आहे.

 

मागील पाच वर्षात कोविड महामारी च्या काळातही मंडळाद्वारे प्रशासनाचे विनंती वरून देसाईगंज येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजन करून अनुक्रमे 160, 130, 170, 254,188 युनीट रक्त शासकीय जिल्हा रुग्णालयाला पुरवठा केला होता.

 

या वर्षी ही देसाईगंज (वडसा) येथील रक्तदान शिबीरात परिसरातील भाविक व नागरिक मोठ्या संख्येने रक्तदान करणार आहेत. जवळपास 250-300 महीला-पुरूष रक्तदान करतील अशी अपेक्षा संत निरंकारी मंडळाचे झोनल इंचार्ज श्री किशन नागदेवे यांनी व्यक्त केली आहे.

 

जनजागृती साठी गुरूवार दि. 24 एप्रिल ला संत निरंकारी सेवादल द्वारे जनजागृती रैली संपूर्ण शहर परिसरात काढण्यांत आली होती. त्यात जवळपास 100 महिला-पुरूष सेवादल यांनी गणवेशात भाग घेतला.

 

सर्व मानवप्रेमी जनतेनी रक्तदान शिबीरात भाग घेवून रक्तदानाचे महान कार्य करावे अशी विनंती संत निरंकारी मंडळाचे झोनल इंचार्ज श्री किशन नागदेवे यांनी केली आहे

- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

फौजदार अभिजीत काळे यांना गडचिरोली जिल्ह्यातील उल्लेखनिय कामगिरीसाठी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान

✍️ :पोलिस उपनिरीक्षक अभिजीत काळे यांना गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलातील उल्लेखनिय कामगिरी करुन बजाविलेल्या सेवेसाठी २०२४ या वर्षाकरीता 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान महाराष्ट्र दिनी...

सामान्य माणसाचे विकासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल – सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची महाराष्ट्र दिनी ग्वाही

गडचिरोली, (जिमाका) दि.01: 'सामान्य माणसाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल,' अशी...

Recent News

Most Popular

Recent Comments