सफर ए शहादत सप्ताहा निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन ।। देसाईगंज २५ । देसाईगंज येथिल पविञ गुरुद्वार येथे आज रक्तदान शिबीरासह भजन किर्तनाचे आयोजन करण्यात आले। पंजाब प्रांतातिल चमकौर साहेब युद्ध संग्रामात सिख संप्रदायाचे धर्मगुरु यांच्या दोन पुञांना मुघलांविरुद्ध लढतांना विरगती प्राप्त झाली त्यांच्या वयाने लहान असलेल्या दोन मुलांना व गुरुगोविंदसिंग यांच्या आईला मुघलांनी कैद केले व त्यांना धर्म स्विकारण्यासाठी दबाव टाकला माञ वयाने ६ व ९ वर्षाच्या बालकांनी व त्यांच्या आजींनी धर्मपरिवर्तनास ठाम नकार दिला तेव्हा मुघलांनी या तिघांनाही भिंतीत दफन केले गुरु गोविंद सिंगांनी आपले चार ही पुञ मोघलांविरुद्ध लढतांना गमावले त्यांची आठवण व त्यांच्या विरगतिला पुण्यस्मरण म्हनुण सिख समुदाय दरवर्षी २६ डिसेंबर हा दिवस सफर ए शहादत म्हनुण पाळतो, देसाईगंज येथिल सिंग सभेच्या माध्यमातुन पविञ गुरुद्वारा येथे २१ डिसेंबर ते २८ डिसेंबर या सप्ताहात दररोज गुरु नाम जप किर्तन भजन लंगर या सह रक्तदान शिबिराचे आयोजनासह उद्या समारोपिय कार्यक्रमात आदर्श महाविद्यालयाचे प्रांगणात बाल शहिद दिवसानिमीत्य चिञपटीचे प्रदर्शन करणार आहे त्याच बरोबर सिख संप्रदायाची पारंपारिक तलवारबाजी चे ही प्रदर्शन करणार आहे। आज च्या रक्तदान शिबीरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले या प्रसंगी गुरुद्वाराचे मुख्य ग्रंथी गुरमित सिंग अरोरा, गुरुद्वारा अद्यक्ष डा.लालसिंग खालसा,डॉ इंदरप्रित टुटेजा, डॉ प्रा अमरजित सिंग चावला, नंदु चावला, डॉ प्रणय कोसे,सेवादल हरीश ठकरांनी ,प्रिन्स अरोरा गुरमीतसिंग अरोरा, इंद्रपालसिंग खालसा,गुरू टूटेजा,छोटू टूटेजा यांचेसह मान्यवर उपस्थित होते ।।
????????????????