देसाईगंज 30 जानेवारी हा महात्मा गांधी यांची पुण्यतिथी देशात कुष्ठरोग निवारण दिन म्हणून पाळलं जात आहे. याचे औचित्य राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग गडचिरोली व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय देसाईगंज यांच्या संयुक्त विद्यमाने “स्पर्श जनजागृती अभियान” दिनांक 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 पर्यंत राबविण्यात येत आहे. याची सुरुवात जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विदयालय कुरुड येथून करण्यात आली. ‘कुष्ठरोग ना शाप है ना पाप है ये तो जंतू का प्रताप है, दिसता चट्टा आपल्या नाजिकच्या आरोग्य संस्था मध्ये भेटा’ या म्हणी प्रमाणे जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विदयालय, कुरुड येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून वर्ग 5 ते 10 वी च्या विदयार्थी यांना कुष्ठरोग ची सुरुवात, लक्षणे, निदान आणि उपचार या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून डॉ. पी. जी सडमेक वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कुरुड, दिनकर संदोकर पॅरा मेडिकल वर्कर कुष्ठरोग तालुका आरोग्य अधिकारी देसाईगंज, आरोग्य सहाय्यक भांडारकर, कुर्वे व आरोग्य सेवक गेडाम हे होते. या निमित्याने देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा, शिवराजपूर, तुळशी, विसोरा, शंकरपूर, पोटगाव, चोप कोरेगाव इत्यादी ठिकाणी शालेय प्रभात फेरी चे आयोजन करवून जनजागृती करण्यात आली आहे. या मोहीम मध्ये आरोग्य शिक्षण व माहिती देण्यासाठी प्रत्येक गावात एकदिवस सर्वेक्षण, ग्रामसभा, चालता बोलता कार्यक्रम, महिला व युवक मंडळ सभा, शालेय मुलांसाठी प्रश्नमंजुषा असे विविध उपक्रम राबवून नवीन कुष्ठरुग्ण शोधण्याचा आरोग्य विभाग ने संकल्प केला आहे. या साठी तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्ती यांचे सहकार्य घेण्याचे निश्चित केले असल्याचे प्रतिपादन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक कुंभरे यांनी केले आहे.
✍️गडचिरोली :निवडणुकांचे बिगुल वाजलं असून विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता...
मुबई : विधानसभा निवडणुकीसाठी घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून याद्या जाहीर करण्याचा धमाका सुरू झाला
त्यानंतर आता महायुतीतून भाजपकडून दुसरी यादी जाहीर झाली आहे....