#desaiganj talab नैनपूर वॉर्ड वडसा तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची गरज।
#देसाईगंज: नैनपुर येथील शेकडो वर्षाची परंपरा असलेला तलाव असून या तलावाचे पुनरजीवन करून सौंदर्यीकरण केल्यास गावाच्या सौंदर्यात भर पडणार आहे. पण याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. तेव्हा याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
नैनपुर तलावात पाण्याचा अत्यल्प जलसाठा आहे,या तलावाचे पुनरजीवन करून सौंदर्यीकरण केल्यास गावाच्या सौंदर्यात भर पडणार आहे. पण याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. तेव्हा याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.गाव अस्तीत्वात आला तेव्हापासून नैनपुर वॉर्डातील तलाव खोल असल्याने येथे वर्षभर नेहमी पाणी साचून असते.वॉर्डातील नागरिक कावड, घागर, बादलीने पाणी नेत होते. किंवा जनावरे तलावावर पाणी पिण्यासाठी येत होते सध्या परिस्थिती बदलली आहे सध्या पाण्याची सोय घरोघरी झाली विहीरी बोरवेल्स झाल्याने तलावाच्या पाण्याचा वापर होत नाही. तलावातील पाणी नागरिक शेतीसाठी नेत होते पण ते देखिल होत नसल्याने बाराही महिने तलावात पाणी साचून राहते,तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्याचे खोलीकरण होणे आवश्यक आहे. तसेच तलावाच्या सभोवताल झाडे लावून नगर परिषद देसाईगंज ने सौंदर्यीकरण करने गरजेचे आहे तलावाला व्यापक स्वरूप देऊन सौंदर्यीकरण केल्यास गावाच्या सौंदर्यात वाढ होईल, देसाईगंज शहर हा तीन जिल्हातील मध्यवर्ती ठिकाण आहे येथे पर्यटनास मोठी चालना दिल्यास तलावात बोटींग सुरू करता येईल. देसाईगंज शहरात तीन जिल्ह्यातील नागरिक खरेदी करिता वडसा तालुक्यात येत असतात चंद्रपुर,भंडारा गोंदिया येथील नागरिक खरेदीसाठी येत असतात. तलावात नैसर्गीक सौंदर्यात वाढ करून सोयीसुविधा निर्माण केल्यास अनेकांच्या हाताला काम मिळू शकते.थोडा समोरच आरमोरी रोड ला लागून फॉरेस्ट चा सुंदर बगीचा आहे शेकडो नागरिक या ठिकाणी फिरायला येत असतात तलावाचा सोंद्रीकरन केल्यास पर्यटनास चालना मिरेल तलावात नौकाविहार सुरू केल्यास हे स्थळ पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्यास वेळ लागणार नाही,या तलावाची कायापालट करण्याची मागणी गावाच्या नागरिकांनी केली आहे गावाचा मधोमध हे तलाव असून येथे लोकांची वर्दळ दिवसभर असते. तेव्हा या तलावास सौंदर्यीकरण करून गावाचा विकास करणे गरजेचे आहे. शासन पर्यटन स्थळाच्या विकासासाठी मोठा निधी देत असते.नैनपुर येथील तलावाच्या सौंदर्याकरणासाठी पुढाकार घेऊन तलावाचा कायापालट करण्याची मागणी आम आदमी पार्टी देसाईगंजचे नैनपुर वॉर्डातील सिद्धार्थ गणवीर,निशा नाजूक लुटे भास्कर लुटे शामराव कार ,चंदकांत वाघमारे,विनोद शेंडे नंदा ताई सुखदेवे, तसेच येथील निसर्गप्रेमी लोकांनी केली आहे.
??????????????????????????????????????

??????????????????????????????????????

