#kurud shankar pat #
कुरुड :- देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथे ९ फेब्रुवारी २०२३ रोजी होणारी बैलांची शंकरपट काही कारणास्तव रद्द झाली असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.मागील काही दिवसांपूर्वी कुरुड येथे बैलांची शंकरपट होणार असल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते.गावामध्ये शंकरपट होणार असल्याने आजूबाजूच्या परिसरातील व गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र काही अपरिहार्य कारणास्तव होणारी बैलांची शंकरपट रद्द करण्यात आली आहे. याची सर्व कुरुड वासीय जनता व शंकरपट शौकिनांनी नोंद घ्यावी असे कळविण्यात आले आहे.
????????????????
