✍️2024 नागपूर : #nagpur newz#गेल्या दहा वर्षात नागपूरात एक लाख कोटी पेक्षा जास्त निधीचे विकास कामे झाले. यात चांगले रस्ते झाले, 70 टक्के नागपुरकरांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळते आहे.
आम्ही मिहानमध्ये 78 हजार स्थानिक तरुणांना नोकरी दिली आहे. जे देशात, जगात कुठे नाही, असे अनेक प्रकल्प एकट्या नागपुरात बघायला आज मिळत आहे. गेल्या 60-70 वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते महायुतीने दहा वर्षात केलं आहे. ही सर्व विकासकामे माझ्यामुळे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) किंवा चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) अथवा अन्य कोणामुळे नाही. तर तुम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळे झाले आहे. आजवर जेवढा विकास तुम्ही पाहिला तो फक्त ट्रेलर होता, असली पिक्चर तो अभी बाकी है! त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवारांना,देवेंद्र फडणवीसांना संधी द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) केलंय. ते नागपुरातील (Nagpur) भाजपच्या शक्तिप्रदर्शन रॅलीत बोलत होते.
आपल्यापेक्षा आपले काम बोलत आहे. म्हणून आज जास्त बोलायची गरज नाही. गडकरींच्या नेतृत्वात आपण नागपुरात केलेला बदल लोक आज डोळ्यांनी पाहत आहेत. गेल्या दहा वर्षात आम्हाला साडेसात वर्षे मिळाले, आमच्या साडेसात वर्षाचा काळ आणि त्यापूर्वीचा पंधरा वर्षाचा काळ (महाआघाडीचा सरकार) तुलना करा. तुमच्या आशीर्वादानेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री होते आले. मोदींनी नवीन भारताची निर्मिती सुरू केली आहे आणि त्यांचे नेतृत्वात आम्ही नवीन महाराष्ट्राची निर्मिती सुरू केली