✍️गोन्दिया वडेगाव ग्रामपंचायत च्या वतीने एक पेड माँ के नाम आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत असंख्य वृक्ष लागवट मागील वर्षभरात सुरु आहे यातच संपूर्ण उन्हाळा ज्या उन्हात पुरुष सुद्धा काम करायला विचार करतात यातच संपूर्ण उन्हाळा उन्हाची तमा नं बाळगता आजपर्यंत वडेगाव येथील 2 महिला 1) वत्सला
श्रीराम तलांजे 2) रेखा बाबुलाल सयाम यांनी खड्डे खोदन्या पासून वृक्ष लागवट पर्यंत ज्यांनी काम करीत आहेत या त्यांच्या कार्याची दाखल घेत वडेगाव येथील सरपंच श्रीकांत भीमराव लोणारे याच्या संकल्पनेतून या दोन्ही श्रमिक महिलाच्या हस्ते आज ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण सोहळा पार पाडण्यात आला व आज पासुन जो गावाच्या हिताचे व गावासाठी उल्लेखानिय कार्य करणाऱ्या ग्रामवासीयास ग्रामगौरव पुरस्कारा ची पन घोसना करण्यात आली तथा या स्वांतत्र्य दिनी सिंगल युज प्लास्टीक चा वापर करणार नाही याची शपथ घेण्यात आली व ग्रामपंचायत ला १ कीलो प्लॉस्टिक दिल्यास ग्रामपंचायत प्लॉस्टिक च्या मोबदल्यात १ किलो साखर देण्याचे नागरीकाना सांगण्यात आले





