Thursday, January 22, 2026
HomeUncategorizedस्वतंत्रता दिवसाचे औचित्य साधून वडसा येथिल चावला बंधुचा सत्कार

स्वतंत्रता दिवसाचे औचित्य साधून वडसा येथिल चावला बंधुचा सत्कार

✍️देसाइगंज: वडसा येथील सरदार आनंदसिंग चावला व त्यांचे बंधु सरदार जसपालसिंग चावला यांचा सत्कार शिवसेना नेते तथा गडचिरोली जिल्ह्याचे सह पालकमंत्री आशिषजी जयस्वाल साहेब यांचे हस्ते 15 आगस्ट ला करण्यात आला. सरदार जसपालसिंग चावला यांनी आजपर्यंत जवळपास 150 च्या वर अपघातग्रस्त लोकांचे प्राण वाचविले आहेत. विशेष बाब म्हणजे ज्या दिवशी चावला बंधुचा सत्कार झाला त्या दिवशी सुद्धा सरदार जसपालसिंग हे एका गंभीर जखमी व्यक्तीला घेऊन आरमोरी येथील सामान्य रुग्णालयात होते. वडसा परिसरात कुठेही अपघात झाल्यास सामान्य जनतात चावला बंधूना फोन करतात, व क्षणाचाही विचार न करता जसपालसिंग घटनास्थळी पोहचून मदत करतात. कधी कधी तर त्यांना स्वतः च्या खिशातील डिझेल टाकून जखमी रुग्णाला गडचिरोली येथे पोहचवावे लागते. या पवित्र अशा कार्यात त्यांना त्यांच्या कुटुंबियांचे सुद्धा तेवढेच सहकार्य लाभते.वडसा येथील रेल्वे बोगद्यातील एका पागल महिलेचे बाळंतपण असो, किंवा अपघात होऊन कुणी पडला असो, किंवा रस्तावरील ट्रॅक्टर च्या चिखलामुळे झालेले अपघात असोत, सरदार जसपालसिंग हे देवदूत्ता सारखे धावून जातात व रुग्णाचे प्राण वाचवितात.

बरेचदा जखमी रुग्णाच्या खिशात हजारो रुपये असतात, जसपालसिंग हे रुग्णाच्या घरच्या व्यक्तीला फोन करून ती रक्कम परत करतात. सहपालकमंत्री आशिष जी जयस्वाल यांना या सर्व गोष्टीची माहिती होताच त्यांनी वेळात वेळ काढून चावला बंधुचा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सत्कार केला व लवकरच त्यांचा शासकीय स्तरावरून सुद्धा सत्कार करण्यात येईल असे सांगितले. या सर्व कामात चावला बंधूना पोलीस विभागाचे सुद्धा सहकार्य लाभते, व त्यांचे सरदार जासपालसिंग चावला यांनी आभार मानले आहेत. सत्कार कार्यक्रमाच्या वेळी सहपलकमंत्री आशिष जयस्वाल साहेब यांचे सोबत माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल, माजी उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम हे प्रामुख्याने उपस्थित होते.

BHARAT M. DAYALANI
Chief Editor
73870 0041473870 00414
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular