✍️आज मालेवाडा (ता. कुरखेडा) येथेसंत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन, दिल्ली (शाखा मालेवाडा) यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते झाले.यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष किशनजी नागदेवे, ज्येष्ठ नेते माधवदाजी निरंकारी,

हरिशजी निरंकारी, प्रभारी पीएसआय नायक वाडेजी, माजी जि.प. सदस्या गीताताई कुंभरे, सरपंच अनुसयाताई पेंदाम व निरंकारी सेवादलाचे महिला-पुरुष कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते. रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग व सेवादलाचे कष्टामुळे संपूर्ण शिबिर अतिशय यशस्वीरीत्या पार पडले. माजी आमदार कृष्णाजी गजबे म्हणाले :”रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. एका थेंब रक्तामुळे एखाद्याचे आयुष्य वाचते. प्रत्येक तरुणाने या पवित्र सेवाकार्यात सहभागी होऊन समाजाप्रती आपली कर्तव्य बजावलि..
