✍️देसाईगंज/वडसा (दि.१८ ऑगस्ट):आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. रामदास मसराम यांच्या पुढाकाराने प्रथमच देसाईगंज येथे झालेला जनता दरबार ऐतिहासिक ठरला. नगर परिषद सांस्कृतिक भवनात भरलेल्या या दरबाराला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.आरमोरी मतदारसंघात यापूर्वी कधीही न झालेला असा हा पहिला जनता दरबार नागरिकांसाठी थेट न्याय मिळवून देणारे व्यासपीठ ठरले. ग्रामीण व शहरी भागातून आलेल्या शेकडो नागरिकांनी पाणीटंचाई, अपुरा वीजपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सेवांची कमतरता, शैक्षणिक अडचणी, शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात होणारा विलंब, महसूल व इतर विभागातील प्रलंबित प्रकरणे अशा ज्वलंत समस्या थेट

मांडल्या.नागरिकांच्या प्रत्येक तक्रारी गांभीर्याने ऐकून आमदार मसराम यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत आदेश दिले – “जनतेच्या प्रश्नांवर तातडीने आणि परिणामकारक तोडगा काढल्याशिवाय पर्याय नाही!या ठाम भूमिकेमुळे सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला.दरबारातच अनेक प्रश्नांची तत्काळ दखल घेत कार्यवाही

सुरू करण्यात आली.जनता दरबारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान, दिलासा व नव्या विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, हा उपक्रम मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात एक नवा अध्याय ठरल्याचे मानले जात आहे.या वेळी उपस्थित : तहशिरदार प्रितीताई डूडूलकर, गट विकास अधिकारी प्राचीताई कोचरे, नगर परिषद मुख्याधिकारी कुंभरे, कृषी अधिकारी कांबळे,माजी सभापती परसरामजी टिकले, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, धनपाल मिसार, माजी उपसभापती नितीन राऊत, सागर वाढई, जावेद शेख तसेच तालुक्यातील अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या अभिनव उपक्रमामुळे सर्वसामान्य जनतेत समाधान व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले.
