Thursday, October 3, 2024
HomeBrhmhpuri*श्री महाकाली महोत्सव २०२३ मध्ये पी.आर.डी स्पोर्ट्स ,ब्रह्मपुरी ची चमकदार कामगिरी एकूण...

*श्री महाकाली महोत्सव २०२३ मध्ये पी.आर.डी स्पोर्ट्स ,ब्रह्मपुरी ची चमकदार कामगिरी एकूण २८ मेडल ची कमाई .*

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

   *उत्कृष्ट प्रदर्शन :-  १४ गोल्ड, ७ सिल्वर,७ ब्राँझ *

✍️ब्रम्हपुरी:- माननीय आमदार श्री.किशोरजी जोरगेवार साहेब यांच्या पुढाकाराने श्री. माता महाकाली महोत्सव चंद्रपूर २०२३ मध्ये दिनांक २५ व २६ फेब्रुवारी २०२३ ला जिल्हा क्रीडा स्टेडियम ,चंद्रपूर येथे पार पडलेल्या अथलेटिक्स स्पर्धेत पी.आर.डी. स्पोर्ट्स, ब्रह्मपुरी च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत १४ गोल्ड, ७  सिल्वर,७ ब्राँझ अशी एकूण २८पदकांची कमाई केली ज्यामध्ये १२ वर्षाआतील मुलींच्या गटात ६० मीटर,१०० मीटर रनिंग स्प्रिंटिंग व गोळाफेक स्पर्धेत कुमारी.माही अवसरे हीने प्रथम क्रमांक पटकाविला, १६ वर्षाआतील मुलींच्या गटात १००मीटर स्प्रिंटिंग रनिंग मध्ये कुमारी.मोना पिल्लारे हिने प्रथम क्रमांक पटकाविला,१२ वर्षाआतील मुलांच्या गटात लांबउडी कु.अथर्व सोनूले याने प्रथम क्रमांक पटकावला, १२ वर्षा आतील मुलांच्या गटात कु.समृद्ध वैरागडे याने ६० मीटर रनिंग स्प्रिंटिंग मध्ये द्वितीय ,१०० मीटर रनिंग स्प्रिंटिंग तृतीय व गोळाफेक मध्ये तृतीय क्रमांक पटकावला,१२ वर्षा आतील मुलांच्या गटात कु.श्री बिलगया याने द्वितीय क्रमांक पटकावला,१४ वर्षा आतील मुलांच्या गटात कु.प्रसाद धकाते याने गोळाफेक व थाळीफेक या दोन्ही क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला,१४ वर्षा आतील मुलांच्या गटात कु.अजिंक्य आत्राम याने गोळाफेक मध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला,१४ वर्षा आतील मुलांच्या गटात कु. तुषार पचोरी याने १०० मीटर स्प्रिंटिंग रनिंग व लांबउडी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला,१४ वर्षा आतील मुलांच्या गटात कु.सेहल सोनी याने लांबउडी मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला, १४ वर्षा आतील मुलींच्या गटात कुमारी.तुलसी मेश्राम हिने लांबउडी मध्ये प्रथम क्रमांक व १०० मीटर स्प्रिंटिंग रनिंग मध्ये तृतीय क्रमांक पटकावला,१४ वर्षा आतील मुलांच्या गटात कु. अर्णव संगमवार याने २०० मीटर स्प्रिंटिंग रनिंग मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला,१२ वर्षा आतील मुलींच्या गटात कुमारी. स्नेहल फटींग हिने गोळाफेक मध्ये तृतीय क्रमांक पटकावला ,१६ वर्षा आतील मुलांच्या गटात कु.यश मेश्राम याने भालाफेक मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला,१६ वर्षा आतील मुलांच्या गटात कु.यश बन याने ८००मीटर दौड स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला,१८ वर्षा आतील मुलींच्या गटात कुमारी. सानिया नरुले १००मीटर रनिंग व २००मीटर स्प्रिंटिंग रंनिंग मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला तर १४ वर्षा आतील मुलांच्या गटात ४१०० रिले रनिंग स्पर्धेत अर्णव संगमवार,अभिजीत किरमिरे,तुषार पचोरी,सेहल सोनी या खेळाडूंनी सर्वोत्तम प्रदर्शन करीत प्रथम क्रमांक पटकावला ,१२ वर्षा आतील मुलींच्या गटात ४१०० रिले रनिंग स्पर्धेत माही अवसरे, स्नेहल फटींग ,जोना मकासके,एंजल चव्हाण, या खेळाडूंनी सर्वोत्तम प्रदर्शन करीत प्रथम क्रमांक पटकावला ,१२ वर्षा आतील मुलांच्या गटात ४१०० रिले रनिंग स्पर्धेत रौनक गेडाम,समृद्ध वैरागडे, अथर्व सोनूले, क्रीष्णा डोंगरवार, या खेळाडूंनी सर्वोत्तम प्रदर्शन करीत प्रथम क्रमांक पटकावला ,१४ वर्षा आतील मुलींच्या गटात ४१०० रिले रनिंग स्पर्धेत वैष्णवी दोनाडकर ,साची बनकर, तुलसी मेश्राम, श्रुती अगडे, या खेळाडूंनी सर्वोत्तम प्रदर्शन करीत द्वितीय क्रमांक पटकावला , या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण सोहळ्याला उद्घाटक म्हणून चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. किशोरजी जोरगेवार साहेब तर प्रमुख अतिथी म्हणून मा.राजेंद्रजी अडपेवार साहेब माजी नगरसेवक चंद्रपूर, मा. पपुभाऊ देशमुख माजी नगरसेवक चंद्रपूर,मा. सुरेशजी तुमे सर सचिव चंद्रपूर जिल्हा मास्टर अथलेटिक संघटना,मा. सुरेश जी अडपेवार सर सचिव चंद्रपूर जिल्हा संघटना, कुमारी. पूर्वाताई खेरकर स्पर्धा प्रमुख चंद्रपूर जिल्हा संघटना, डॉ. सचिनजी भेदे,डॉ. संदीप मुनगंटीवार, डॉ.अभय राठोड, डॉ. रिजवान शिवजी ,डॉ. गुरुप्रसाद कुलकर्णी डॉ. प्राजक्ता आसवार, डॉ.श्रीपाद बलकी, डॉ. कल्पनाताई गुलवाडे व अन्य मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेत ७० पेक्षा जास्त क्लब व शाळेमधील ८०० च्या वर खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र मेडल व रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES

Hakajk

spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

*मा.खा.अशोक नेते यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांचे अहेरी नगरी आगमना निमित्ताने पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत….*

दि.१७ जुलै २०२४ *गडचिरोली:- SURJAGAD ISPAT PVT.LTD.आज दि.१७ जुलै २०२४ *सुरजागड इस्पात प्रा.लि.च्या कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री मान.देवेंद्र जी फडणवीस सोबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,...

आम आदमी पार्टी गडचिरोली च्या वतीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा विरोध..

गडचिरोली:##आम आदमी पार्टी देसाईगंजच्या वतीने दिल्लीचे मुख्यमंत्री आप पार्टी संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आमदार कृष्णा गजभिये यांच्या कार्यालय समोर...

Recent News

Most Popular

Recent Comments