Wednesday, January 15, 2025
HomeUncategorizedअनुष्का विराट सुखी आयुष्याच गुपित समोर, अभिनेत्री ने सांगितल्या खास व्यक्तींन दिलेला...

अनुष्का विराट सुखी आयुष्याच गुपित समोर, अभिनेत्री ने सांगितल्या खास व्यक्तींन दिलेला मंत्र

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

Neem Karoli Baba Quotes: काही व्यक्ती त्यांच्या अस्तित्वानंच अनेकांच्या अंधकारमय आयुष्यात प्रकाश आणतात. अशा व्यक्तींचा सहवास लाभणं म्हणजे ईश्वरप्राप्तीहून कमी नाही.अशाच व्यक्तींमध्ये येणारं एक नाव म्हणजे बाबा नीम करोली किंवा नीम करोली बाबा. उत्तराखंडमधील ऋषीकेशपासून काही अंतरावर असणाऱ्या (Kainchi dham) कैंची धाम इथं त्यांचा आश्रम आहे. उत्तर प्रदेशातील अकबरपूर येथे जन्मलेल्या नीम करोली बाबा यांना अनेकजण मारूतीरायाचा अवतार मानतात. नीन करोली बाबा यांच्या भक्तांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे.

सेलिब्रिटी जोडी (Anushka Sharma Virat Kohli) अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या दोघांसाठीसुद्धा (baba neem Karoli) बाबा नीम करोली यांचा शब्द प्रमाण आहे. म्हणूनच ही जोडी शक्य असेल तेव्हा त्यांच्या आश्रमाला भेट देऊन इथं आत्मचिंतन करताना दिसते. नुकतेच हे दोघंही उत्तराखंडला गेले असलानाच अनुष्कानं एक फोटो (instagram) इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोमध्ये ती एका नदीकिनारी ध्यानस्थ बसल्याचं पाहायला मिळत आहे. सूर्याची तेजस्वी किरणं पाण्यावर पडून त्यातून या किरणांचा उजेड अनुष्काच्या संपूर्ण शरीरावर पडताना दिसत आहे. चेहऱ्यावर अतिशय प्रसन्न भाव तरीही मनात कमालीची शांतता असं तिचं रुप पाहताना आपल्याला हवं ते साध्य केल्याचीच भावना जणू तिचा चेहरा व्यक्त करताना दिसत आहे.अतिशय सुरेख आणि प्रसन्न असा फोटो पोस्ट करत तिनं सोबत दिलेलं कॅप्शन खूप बोलकं आहे. हे कॅप्शन म्हणजे नीम करोली बाबा यांचं वचन आहे. ‘तुला दिसत नाहीये का? सगळंकाही उत्तम आहे…- नीम करोली बाबा’ असं अनुष्कानं लिहिलं. या एका वाक्यानं तिच्या आयुष्यात नेमका किती बदल केला आहे हेच हा फोटो पाहताना लक्षात येत आहे.

नीम करोली बाबा यांची आणखी काही वचनं…

कधीच तुमच्या मिळकतीचा इतरांसमोर खुलासा करू नका

आपल्याला किती पगार मिळतो, आपण किती अर्थार्जन करतो याचा खुलासा कधीच कुणासमोर करु नका. असं केल्यानं एखाद्याची वक्रदृष्टी आपल्यालक रडू शकते. त्यामुळं मिळकत कायमच गोपनीय ठेवा असंच बाबा सांगायचे.
दान करा पण, गाजावाजा नको

नीम करोली बाबा म्हणतात की दान आणि पुण्याचं काम हा व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय असतो. त्यामुळं कधीच दान किंवा पुण्याचं काम केल्याच त्याचा गाजावाजा करु नका. असं केल्यानं त्याचं महत्त्वं नष्ट होतं.

भूतकाळावर चर्चा नको

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ असतो. पण, वर्तमानाच असताना भविष्याची चिंता आणि भूतकाळाचा विचार कधीच करू नका. अशानं तुम्ही वर्तमानातील वेळही वाया घालवता।

- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

48 नक्षलवाद्यांनी लॉयड्स मेटल्समध्ये काम करून नवीन मार्ग शोधला

✍️ गडचिरोली:  नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...

गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांनी गांधी चौकातून बाईक रॅली च्या माध्यमातून मुक मोर्चा काढला.

गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...

Recent News

Most Popular

Recent Comments