Wednesday, January 15, 2025
HomeUncategorizedअर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सेन्सेक्स ४०० अंकांनी वाढला

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सेन्सेक्स ४०० अंकांनी वाढला

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

Budget 2023 Share Market : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बुधवारी (दि. १) सकाळपासूनच भारतीय शेअर बाजारात तेजी राहिली आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सेन्सेक्स ४०० अंकांनी वाढला होता.
तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प संसदेत सादर केल्यानंतर सेन्सेक्सने १,१७१ हजार अंकांनी उसळी घेतली. दुपारच्या सत्रात सेन्सेक्स १,१७१ हजार अंकांच्या वाढीसह ६०,७२१ वर गेला. तर निफ्टी २९४ अंकांच्या वाढीसह १७,९५६ वर पोहोचला. शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांना २.२४ लाख कोटींनी श्रीमंत झाले. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २७२.४७ लाख कोटींवर पोहोचले आहे.

नवीन कर प्रणालीमध्ये वैयक्तिक आयकरात ५ स्लॅब तयार करण्यात आले आहेत. आयकर सूट मर्यादा आता ७ लाखापर्यंत केली आहे. तर ३ लाखांपर्यंत उत्पन्नावर कोणताही कर आकारण्यात येणार नाही, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. (Budget 2023 Personal income-tax)

५ स्लॅबमध्ये ३ लाखांपर्यंत कोणताही कर नसेल. तसेच ३ ते ६ लाखांपर्यंत ५ टक्के, ६ ते ९ लाखांपर्यंत १० टक्के, ९ ते १२ लाखांपर्यंत १५ टक्के, १२ ते १५ लाखांपर्यंत २० टक्के आणि १५ लाखांवरील उत्पन्नावर ३० टक्के कर असेल, असे सीतारामन यांनी म्हटले आहे. या घोषणानंतर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आणि दोन्ही निर्देशांकांनी उसळी घेतली.

आजच्या व्यवहारात सेन्सेक्स ४४२ अंकांनी वाढून ५९,९९० वर गेला. तर निफ्टी १७,७८८ वर पोहोचला होता. आजच्या व्यवहारात येस बँक, व्होडाफोन आयडिया, पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स पॉवर ग्रिड यांचे शेअर्स वधारले होते. दरम्यान, आज डॉलरच्या तुलनेत रुपया ०.१८ टक्के वाढून ८१.७७ वर खुला झाला. रुपया मागील सत्रात ८१.९२ वर बंद झाला होता.

सेन्सेक्सवर आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रिड आणि एसबीआय हे टॉप गेनर्स होते. हे शेअर्स सुमारे १ टक्क्याने वाढले आहेत. एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, ॲक्सिस बँक आणि टेक महिंद्रा हे देखील शेअर्स तेजीत आहेत. एल अँड टी हा शेअर्स घसरला आहे. क्षेत्रीय निर्देशांकात निफ्टी रिअल्टी १.३६ टक्के आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस १.१५ टक्के वाढला. बँक, ऑटो, मेटल, फार्मा, एफएमसीजी आणि आयटी शेअर्स वाढले आहेत.

अधिकृत आकडेवारीनुसार, परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २०२३ मध्ये आतापर्यंत २८८.५२ अब्ज रुपयांच्या (३.५३ अब्ज डॉलर) किमतीचे शेअर्स विकले आहेत. (Budget 2023 Share Market)

- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

48 नक्षलवाद्यांनी लॉयड्स मेटल्समध्ये काम करून नवीन मार्ग शोधला

✍️ गडचिरोली:  नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...

गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांनी गांधी चौकातून बाईक रॅली च्या माध्यमातून मुक मोर्चा काढला.

गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...

Recent News

Most Popular

Recent Comments