✍️देशातील लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज अखेर संपणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी PM किसान सन्मान निधी योजनेचा 13वा हप्ता शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करणार आहेत. तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार की तुमच्या खात्यावर पैसे येणार की नाही याबाबत देखील तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे. केंद्र सरकारने बदलला नियम, पाहा आता कोणाला मिळणार PM किसानचा लाभ
पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये त्यांच्या खात्यावर 3 हप्त्यामध्ये दिले जातात. वर्षाला एकूण 6 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात. आतापर्यंत या योजनेला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते. एका अधिकृत निवेदनानुसार, पंतप्रधान मोदी कर्नाटकातील बेळगाव इथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पीएम-किसान योजनेचा 13 व्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहेत. पीएम किसान आणि जल जीवन मिशनच्या लाभार्थ्यांसह सुमारे एक लाख लोक या कार्यक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि कृषी सचिव मनोज आहुजा उपस्थित राहणार आहेत.
ओ*गडचिरोली - वैनगंगा नदीपात्रात ठिय्या आंदोलन!*
गडचिरोली, दि. ५ एप्रिल – वैनगंगा नदीपात्रात गोसेखुर्द धरणाचे पाणी तातडीने सोडावे, या प्रमुख मागणीसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या...
गडचिरोली, २ एप्रिल २०२५ :: माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या अथक पाठपुराव्याला यश आले असून, त्यांच्या मतदारसंघातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी तब्बल ३...