आप चा नागपुरातील अधिवेशनावर मोर्चा.
देसाईगंज शहरातील प्रकाश जीवांनी यांच्या नेतृत्वात धडकले शेकडो कार्यकर्ते मोर्चात.
देसाईगंज:-
आम् आदमी पार्टी चे गडचिरोली उपजिल्हाध्यक्ष प्रकाश जीवांनी यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात कार्यकर्ते धडकले.
केंद्रात तसेच राज्यात बीजेपी ची सत्ता असून या सरकारने चरण सीमा पार ओलांडल्याने फार मोठ्या प्रमाणात महागाई वाढली असून या महागाईने सामान्य माणूस होरपळला गेला असून जगणे कठीण झाले आहे. या सरकारच्या कार्यकाळात बेरोजगारी वाढली असून रोजगार निर्मिति पूर्णतः थांबवली गेली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही, पिकविम्यात फसवणूक करण्यात आली असून विमा कंपन्याशी संगनमत करून विमा कंपनीच्या फायद्याचेच निर्णय ही सरकार घेतं आहे. खताचे भाव गगनाला गवसणी घातली खेरीज वाढलेले आहेत मात्र या खत कंपन्यांना अनुदान देतोय मात्र शेतकरयांना अनुदान देण्यास असमर्थ आहे.देसाईगंज तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांना भरपाई अजून मिळाली नाही, वन जमिनीचे पट्टे त्वरीत देण्यात यावे,शहरातील अनेक वर्षांपासून राहत असलेल्या नागरिकांना पट्टे देण्यात यावे,विजकंपन्याचे खाजगीकरण खपहून घेतले जाणार नाही,स्वस्त वीज मिळाली पाहिजे, राज्यात एक ही शाळा बंद होणार नाही याची हमी द्या, सिटी सर्वे झालेल्या जागेचे नागरिकांना त्वरीत आखीव पत्रिका देण्यात यावी व इतर बऱ्याच मागण्यासाठी नागपुरातील अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चाचे अनुषंगाने देसाईगंज शहरातील गडचिरोलीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जीवांनी यांनी आपल्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्या सह नागपुरला धडकले व मोर्चाचे जिल्हाचे नेतृत्व केले.
?????????????????????????????????????

नागपूर अधिवेशनात देसाईगंज शहरातील शेकडो नागरीक उपस्थित

