काँग्रेसकडून देशभरात निर्देशने करण्यात येत आहेत. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही या निर्णयावरून मोदी सरकावर जोरदार टीका केली.
प्रियांका गांधी म्हणाल्या, भाजपचे (BJP) प्रवक्ते, नेते आणि स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझा भाऊ, माझे आई-बाबा आणि पंडित नेहरुंवर खालच्या पातळीवर टीका करत असतात. मात्र, त्यांना आजपर्यंत कोणतीही शिक्षा झाली नाही. राहुल गांधी यांनी संसदेत गौतम अडाणींचा मुद्दा उपस्थित केला. सरकारला प्रश्न विचारले, म्हणून मानहानीच्या निमित्ताने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा, आरोप प्रियांका गांधी यांनी केला.
Assembly Session : राहुल गांधींच्या मुद्यावर विरोधक आक्रमक : विधानसभा अध्यक्ष कारवाईचा निर्णय घेत नसल्याने सभात्याग
एका वर्षापासून या प्रकरणाला स्थगिती दिलेली होती. याचिकाकर्त्यानेच हे प्रकरण स्थगित करण्याची मागणी केली होती. मात्र, संसदेत राहुल गांधी यांनी गौतम अदाणींच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला प्रश्न विचारले. त्यानंतर याचिकाकर्त्याने अचानक हे प्रकरण पुन्हा बाहेर काढले. मुळात मोदी सरकारला गौतम अडाणींच्या मुद्यावर उत्तर द्यायचेच नाही. त्यामुळे षडयंत्र रचून त्यांनी राहुल यांना संसदेच्या बाहेर काढले आहे, असेही प्रियांका गांधी म्हणाल्या.
Rahul Gandhi : राहुल गांधींवरील कारवाईची अमेरिकेतही दखल; भारतीय वंशांचे खासदार, पंतप्रधान मोदींना म्हणाले…
राहुल गांधी आणि काँग्रेस या विरोधात जोरदार लढा येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमच्या शरीरात शहिदांचे रक्त आहे. ते नेहमी आम्हाला परिवारवादी म्हणतात. मात्र, आमच्या परिवाराने या देशासाठी बलिदान दिले. आम्ही माघार घेणार नाही, आम्ही मोदी सरकारला घाबरणार नाही, असा इशारा प्रियांका गांधी यांनी दिला.
