मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकात अंमलबजावणी संचालयाने म्हणजेच ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने केलेल्या छापेमारीत एका कर्मचाऱ्याने सरकारला तब्बल 263 कोटींत गंडवल्याचं उघड झाले आहे. आयकर परताव्या संदर्भात केलेल्या या घोटाळ्याप्रकरणी ईडीने पुणे, लोणावळा, खंडाळा, कर्जत तसेच कर्नाटकातील उडुपी येथील जमिनी जप्त केल्याचे वृत्त आहे. ईडीने त्या कर्मचाऱ्याच्या आलीशान गाड्या जप्त केल्या आहे. आयकर विभागातील कर्मचारी तानाजी मंडल अधिकारी या व्यक्तीने सरकारला थोडाथोडका नव्हे तर 263 कोटींचा चुना आहे. तो आयकर खात्यात वरिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत आहेत. ईडीच्या रडारवर हा कर्मचारी आला. मग ईडीने छापेमारी करत त्याची सुमारे 166 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, ऑडीसारख्या आलिशान गाड्या आणि मुंबई, पनवेल येथील फ्लॅट अशी सुमारे 166 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. लोणावळा, खंडाळा, कर्जत, पुणे आणि उडुपी (कर्नाटक) येथील स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. लक्झरी कार BMW X7, Mercedes GLS400d, Audi Q7 या गाड्यांचा समावेश आहे. तानाजी मंडल याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लॉग इन वापरून टॅक्स रिफंडच्या माध्यमातून प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या वरिष्ठांशी गोड बोलून त्यांचा लॉग इन आणि पासवर्ड मिळवला. त्याच लॉग इनचा वापर करून तानाजी अधिकारी याने खोटे कर परतावे (टॅक्स रिफंड) करत सरकारला 263 कोटीत गंडवले. तानाजीने 263 कोटींची रक्कम एसबी एंटरप्रायझेस नावाच्या फर्मच्या बँक खात्यात जमा केली.पैशांचे नियंत्रण मंडल यांचा साथीदार भूषण पाटील याच्याकडे ठेवले होते. नोव्हेंबर 2019 पासून 263 कोटी रुपयांचे एकूण 12 फसवे TDS रिफंड केल्याचे तपासात उघड झाले. भूषण पाटील आणि त्यांचे सहकारी आणि शेल कंपन्यांच्या इतर खात्यांमध्ये निधी वर्ग करत होते. ईडीने पीएमएलए कायद्याअंतर्गत तपास केल्यावर सर्व प्रकार उघड झाला.तानाजी अधिकारी याने नोव्हेंबर 2019 पासून वर्षभरात 12 खोटे कर परतावे मंजूर केले. या सर्व टॅक्स रिफंडच्या माध्यमातून जवळपास 263 कोटी रुपये तानाजीने एस.बी. एंटरप्रायझेसच्या बँक खात्यात वळते केले. 2007-08 आणि 2008-09 या आर्थिक वर्षातील टॅक्स रिफंड बाकी असल्याचे दाखवून तानाजी अधिकारी याने 263 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केला.
✍️गडचिरोली :निवडणुकांचे बिगुल वाजलं असून विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता...
मुबई : विधानसभा निवडणुकीसाठी घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून याद्या जाहीर करण्याचा धमाका सुरू झाला
त्यानंतर आता महायुतीतून भाजपकडून दुसरी यादी जाहीर झाली आहे....