Thursday, February 6, 2025
HomeUncategorizedएकीकडे मंदी, नोकऱ्या जातायत; दुसरीकडे अर्थसंकल्पात काय मिळणार?, देशाचं लागलं लक्ष

एकीकडे मंदी, नोकऱ्या जातायत; दुसरीकडे अर्थसंकल्पात काय मिळणार?, देशाचं लागलं लक्ष

नवी दिल्ली: अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक वर्ष २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर करतील. जगभरात मंदीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून नोकरकपातीचा धडाका लावला आहे. भारताच्या उंबरठ्यावर मंदीचे ढग जमू शकतात, असा कयास बांधला जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाजूने कौल देत दिलासा दिला आहे. अर्थसंकल्पातून आज विविध क्षेत्रांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणत्या महत्वाच्या घोषणा केल्या जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.आजच्या अर्थसंकल्पात कोणत्या घटकाला दिलासा मिळणार आणि कुणावर कराचा बोजा लादला जाणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे, सकाळी अकरा वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प मांडतील. पायाभूत सुविधांना अधिक निधी उपलब्ध करून देण्यावर आणि इमारती आणि रुग्णालयांसाठी खासगी भागीदारी वाढविण्यासाठी तसेच रुग्णालयातील कामकाजाची क्षमता वाढवण्याची शक्यता अर्थ वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. तसेच जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पात काय-काय असणार आहे. राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी यंदा आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला.  यात चालू आर्थिक वर्षात (२०२३-२४) देशाची अर्थव्यवस्था ६ ते ६.८%नी वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशात शेअर बाजाराची वाढ वेगाने होत आहे. ऊर्जा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात वाढत्या गुंतवणुकीमुळे बाजार ३.९% इतक्या दराने वाढत आहे. या बाबतीत भारत इतर अनेक देशांना मात देईल असे दिसत आहे. कोविड-१९ साथीच्या २ वर्षांच्या काळात घरांच्या किमतींत मंदी होती. या किमती आता वाढू लागल्या आहेत. मागणी वाढल्यामुळे पडून असलेल्या घरांची संख्या कमी झाली आहे. गृहकर्जांचा व्याज दर वाढलेला असतानाही घरांची विक्री वाढली आहे. देशात २०३० पर्यंत ई-वाहनांची बाजारपेठ माेठी झेप घेणार असून दरवर्षी १ काेटी ई-वाहनांची विक्री हाेणार असल्याचा अंदाज आहे. यात ५ काेटींहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष राेजगार निर्माण हाेण्याची अपेक्षा आहे. हे क्षेत्र दरवर्षी ४९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.कृषी क्षेत्राने यंदा चांगली कामगिरी केली. हवामान बदलाचा प्रतिकूल प्रभाव आणि शेतीचा वाढता खर्च या पार्श्वभूमीवरनवी दिशा देण्याची गरज आहे. मागील ६ वर्षांत कृषी क्षेत्राचा सरासरी वृद्धीदर ४.६ टक्के राहिला. २०२१-२२ मध्ये निर्यात उच्चांकी ५०.२ अब्ज डॉलरइतकी राहिली.

- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

विकासकामांना पूर्ण वेगाने पूढे न्या – मुख्य सचिव सुजाता सौनिक दोन आठवड्याच्यावर विकासकामे प्रलंबित ठेवू नये शासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढवा

✍️गडचिरोली दि. 22: राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज गडचिरोलीत प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्ह्यातील विकास कामांना गती देत त्या पूर्ण वेगाने पूढे...

दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार ‘गडचिरोलीसाठी’ महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या दिवशी 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार

✍️गडचिरोली दि.22 : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात गुंतवणूकिचा पहिला करार गडचिरोलीसाठी करण्यात...

Recent News

Most Popular

Recent Comments