वाशिम:वाशिम जिल्ह्यातील गणेशपूर धानाेरा या गावातील जिल्हा परिषद शाळेत एकच विद्यार्थी शिक्षण घेत असून, एकच शिक्षक त्याला शिक्षणाचे धडे देतात. कार्तिक बंडू शेगोकार असे विद्यार्थ्याचे नाव असून तो इयत्ता तिसरीत आहे. एक पटसंख्या असणारी ही बहुदा राज्यातील एकमेव शाळा असावी. या शाळेत वर्ग १ ते ५ असून, ४ वर्गखोल्या आहेत. पण विद्यार्थी एकच आणि शिक्षकही एकच आहे. तरीही ही शाळा सुरू असल्याने सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. शिक्षक किशोर मानकर म्हणाले, गावात विद्यार्थीच नाहीत. एक विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने ताे गावातीलच शाळेत शिक्षण घेत आहे.
