✍️:महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यादरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) राज्याच्या डीजीपी रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे निर्देश दिले आहेत. काँग्रेसकडून राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याबद्दल तक्रार करण्यात आली होती.या तक्रारीची दखल घेत आयोगाने हा निर्णय घेतला आहे. तसेच शुक्ला यांचा पदभार सर्वात वरिष्ठ IPS अधिकाऱ्याकडे सोपवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेतय
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत. पटोले म्हणाले की, निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो… ज्या पद्धतीने झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये डीजी लगेच बदलले गेले होते, रश्मी शुक्ला एवढे दिवस का लागले हा प्रश्न अनुत्तरीत आहे. रश्मी शुक्ला यांना पदावरून दूर केल्यानंतर निवडणुकीच्या कुठल्याही कामांमध्ये राहिल्या नाही पाहिजे अशी आमची मागणी आहे.