देवरी पुराडा :जगातील 90 देशात,40 करोड जनजाती/आदिवासी राहतात,हे जागतीक लोकसंख्येच्या 5% आहेत.जगात 4000 आदिवासी बोलीभाषा बोलतात. 5000 सांस्क्रुतीची आदिवासी जोपासना करतात.2011 प्रमाणे भारतात 10.49 करोड आदिवासी असतात.चिन मध्ये 11.2 करोड आदिवासी असतात.80% जौवविविधतेची जोपासना करतात.पण पुर्वि युरोपीय वसाहत वाध्यानी अमेरीका,ऑस्ट्रेलिया,या देशातील 11 कोटी तर कोलंबस ने आपल्या आफ्रीका ते अमेरीका प्रवासात 75 लाख आदिवासीची कत्तल केली.त्याना आपल्या मुळ ठिकानावरुन हाकलुन दिल,धर्मांतरन केल. त्या सर्व तेथील मुळ च्या रहिवाश्याना न्याय देण्यासाठी UNO ने 1993 ला जागतीक मुलनिवासी वर्ष, 1993 ते.2004 हे दशक व 9 ऑगस्ट हा दिवस जाहिर केला पण अशी कत्तल भारतात झाली नाहि.पण जगातील आदिवासीच्या दु:खात सहभागी होण्या करीता आपण 9 ऑगस्ट दिवस साजरा करतो सर्व आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी हा सर्व ईतिहास समजुन घ्यावा व मा.प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी यानी 15 नोव्हेंबर या भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जाहिर केलेला "जनजाती गौरव दिवस "मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस(संघटन),भाजपा ST मोर्चा.महाराष्ट्र तथा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलीत मित्र, महाराष्ट्र. यानी देवरी पुराडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील जागतीक आदिवासी दिवस या कार्यक्रमात उदघाटक म्हणून केले.अध्यक्ष मा.आम.संजय जी पुराम भाजपा प्रदेश चिटणीस,महाराष्ट्र हे होते*
*यावेळी मा.आम.संजय जी पुराम श्री ईश्वर कुमरे जिल्हामहामंत्री ST मोर्चा गडचिरोली यानी मार्गदर्शन केले.मुख्याध्यापक श्री कापसे जी सरपंच, गावकरी,विध्यार्थी,शिक्षक उपस्थित होते*
✍️ गडचिरोली: नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...
गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...