पालघर, सातारा, पेण, पनवेल, जळगाव, चाकण येथे राज्य कामगार विमा महामंडळाच्या माध्यमातून रुग्णालये उभारण्यात येणार असून त्यासाठी तातडीने शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. केंद्रीय पर्यावरण, वने व कामगार मंत्री भूपेंद्र यादव उपस्थित होते.
पश्चिम घाट, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र, तसेच व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य याअंतर्गत असलेली गावे पुनर्वसित करताना देण्यात येणारी मदत वाढविणे, सीआर झेड २ अंतर्गत एसआरए प्रकल्प याविषयी देखील दोन्ही मंत्र्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली.