Sangali Whale vomit | व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या टोळीला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे.तर दोघांना अटक करत त्यांच्याकडून तब्बल पावणे सहा कोटींच्या व्हेल माशाची उलटी पदार्थ जप्त करण्यात आला आहे.सांगली शहरातल्या शामराव नगर जवळील एपीजे अब्दुल कॉलेज जवळ बंदी असलेल्या व्हेल माशाची उलटीची विक्री करण्यासाठी काही व्यक्ती येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून दोघात संशयितांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता,त्यांच्याजवळ व्हेल माशाची 5 किलो वजनाची उलटी आढळून आली.
