पूना:पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. अशात शनिवारी रात्री कसब्यात नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते पुण्यात काल रात्री मीठगंज पोलीस चौकी समोर नागरिक रस्त्यावर उतरले होते. उमेदवारांकडून पैसे दिले जात आहेत. तसेच दबाव आणून मारहाण केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. पैसे वाटप आणि दबाव याला विरोध करत काल रात्री महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. कसबा पेठ पोट निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप झाल्याचा आरोप काल दंगेकर यांनी केला होता. रात्रीही मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप होत असल्याचं निदर्शनास आल्याचं सांगत लोया नगर गंज पेठ भागातील महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या. नागरिकांनी पोलिसांकडे या बाबत कारवाईची मागणी केली आहे.पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीची लढत अधिक रंगत होत चालली आहे. काल धंगेकर यांनी असाच आरोप करत आंदोलन केलं होतं. कसब्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वांचेच या निवडणुकीकडे लक्ष वेधले आहे.कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने या जागेसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी आज (२६फेब्रुवारी) मतदान होत आहे. रविवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कसबा पोटनिवडणुकीत एकूण १६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
✍️गडचिरोली दि. 22: राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज गडचिरोलीत प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्ह्यातील विकास कामांना गती देत त्या पूर्ण वेगाने पूढे...
✍️गडचिरोली दि.22 : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात गुंतवणूकिचा पहिला करार गडचिरोलीसाठी करण्यात...