ही आहे भारतीय महिला अंडर 19 संघातील खेळाडू अर्चना देवी.
इंग्लंड विरुद्धच्या T20 वर्ल्ड कप फायनल मध्ये भारताच्या विजयात या खेळाडूचा मोलाचा वाटा आहे.
वडील कॅन्सरने वारले, भाऊ सर्प दंशाने वारल्या नंतर आईने अर्चनाला समाजाचे घाणेरडे टोमणे सहन करत वाढवले, शिकवले.
मुलीला शिकण्यासाठी बाहेर गावी हॉस्टेलमध्ये ठेवल्यानंतर गावकऱ्यांनी “तू मुलीला विकून टाकले” असे आरोप अर्चनाच्या आईवर लावले..
ज्या लोकांनी अर्चनाच्या आईला इतके वर्ष त्रास दिला, आज तेच लोक अर्चनाच्या आईचे अभिनंदन करण्यासाठी दारात उभे आहेत.


