Wednesday, January 15, 2025
HomeUncategorizedभारत रशिया मैत्रीचा "छोटा दूत"

भारत रशिया मैत्रीचा “छोटा दूत”

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

भारत रशिया मैत्रीचा “छोटा दूत”

# सिंधुदुर्ग : मिरॉन नावाचा केवळ अकरा वर्षाचा रशियन मुलगा आई-वडिलांबरोबर भारत फिरण्यासाठी आला .परंतु सध्या भ्रमंतीऐवजी सिंधुदुर्ग मधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत रमला आहे . मिरॉन भारत- रशिया घट्ट मैत्रीची प्रचिती छोटा दूत बनून देतो आहे .
    सिंधुदुर्ग मधल्या आजगाव गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक  शाळेत सध्या गावातील मुलांबरोबरच एक परदेशी चिमुकला अध्ययन करतोय . मिरॉन नावाचा अकरा वर्षाचा मुलगा सहा महिन्यासाठी आई-वडिलांबरोबर पर्यटक म्हणून रशिया हुन आला . आई-वडिलांबरोबर पर्यटक म्हणून फिरताना आजगावच्या या शाळेने मात्र त्याला आकर्षित केले आणि त्याने आई-वडिलांकडे शाळेत प्रवेश करून देण्याचा हट्ट धरला .आता गेले महिनाभर मिरॉन येथील मुलांबरोबर चक्क मराठीमध्ये शिक्षण घेतो आहे . वर्गातील मित्रांबरोबर खेळांमध्ये आणि कवायतींमध्ये रमतो आहे. विशेष म्हणजे मित्रांबरोबर संवाद साधताना भाषेचा कोणताही अडसर  त्याला जाणवत नाही . मराठीतले काही शब्द तसेच अंक तो लिहिण्या बोलण्यासाठी शिकला आहे . येथील भाषा, संस्कृती , खाद्यपदार्थ यावर तो प्रेम करू लागला  आहे .त्याचा आवडता खाद्यपदार्थ  वडापाव आहे . शाळेतली प्रार्थना देखील त्याने पाठ केली आहे . शाळांमध्ये दिला जाणारा पोषण आहार सुद्धा तो आवडीने खातो . महत्वाचे म्हणजे मिरॉनने स्वतःला पाहुणा विद्यार्थी म्हणून कोणतीही विशेष वागणूक न देण्याची विनंती शिक्षकांना केली आहे . शाळेतील सर्व शिक्षक सुद्धा त्याच्या समरसतेचे कौतुक करतात आणि त्याला आवडीने शिकवतात .
      चार महिन्यानंतर त्याला रशियात परत जावे लागणार आहे परंतु पुन्हा संधी मिळाली तर मी नक्कीच परत येईन , असा विश्वास देखील तो व्यक्त करतो आहे. त्याची भारतीय भाषा शिकण्याची आवड बघून त्याला जिल्हा परिषद शाळेत त्याला तात्पुरता प्रवेश देण्यात आला आहे . भारतीय शिक्षण धोरणानुसार प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार देण्यात आला आहे आणि याचे पालन ही जिल्हा परिषद शाळा करत आहे . भारतीय समाज जीवनाशी एकरूप झालेला मिरॉन खऱ्या अर्थाने भारत - रशिया मैत्रीचा छोटा दूत आहे .

- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

48 नक्षलवाद्यांनी लॉयड्स मेटल्समध्ये काम करून नवीन मार्ग शोधला

✍️ गडचिरोली:  नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...

गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांनी गांधी चौकातून बाईक रॅली च्या माध्यमातून मुक मोर्चा काढला.

गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...

Recent News

Most Popular

Recent Comments