दिनांक : 25 जानेवारी 2023
मतदानाच्या अधिकाराचा वापर करून लोकशाही बळकट जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
भंडारा:•जे. एम. पटेल महाविद्यालयात 13 वा राष्ट्री दि. 25: राष्ट्रीय मतदार दिवस मतदार जागरू आणि निवडणुक प्रक्रीयेत लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी साजरा करण्यात येतो. लोकशाहीत मत व्यक्त करणारे प्रभावी साधन मतदान आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आज मतदार कार्डसाठी नोंदणी करून लोकशाही सदृढ करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. जे.एम.पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव बिजू गवारे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील आणि उपजिल्हाधिकारी रविद्र राठोड आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले, 25 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रीय निवडणुक आयोगाची स्थापना झाली आणि देशातील प्रत्येक नागरिकास मतदानाचा अधिकार मिळाला. या दिनाचे औचित्य साधून 2011 पासून 25 जानेवारीला राष्ट्रीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जात असतो. निवडणुक आयोगातर्फे यादिवशी तरूण विद्यार्थ्यांना मतदार शिक्षण आणि सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जात आहेत. यामध्ये मतदार नोंदणी मोहीम, जनजागृतीपर अभियानांतर्गत रॅली आणि विविध कार्यक्रमांचा समावेश केला जातो. मतदार जागृतीसाठी निवडणुक गीतही आयोगाने आज प्रसारण केले आहे. निवडणुक आयोग पारदर्शक आणि संवैधानिकरित्या निवडणुकांचे आयोजन करतो. त्यामुळे आपलीही जबाबदारी आहे की आपण सुध्दा या प्रक्रीयेत सहभाग घेवून चांगल्या प्रतिमेच्या उमेदवारांना निवडून द्यावे.
यावेळी, संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून योग्य उमेदवारास मतदान करणे आवश्यक आहे. उमेदवार सुशिक्षित महिलांचा आदर करणारा, स्वच्छ चारित्र्याचा असल्यास अशा उमेदवारांचा विचार करणे आवश्यक आहे असे ही जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी म्हणाले म्हणाले. बिजू गवारे,सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी मतदाराने सजग व जागृत राहून मतदान करावे असा आशावाद व्यक्त केला. प्रशासकीय अधिष्ठाता डॉ.कार्तिक पनिकर यांनी मतदान करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे, हे कर्तव्य आपण बजावले पाहिजे असे मत व्यक्त केले. उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांनी प्रास्तावीकात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्टे व भारत निवडणूक आयोग अंतर्गत राबविण्यात आलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली.
यावेळी जिल्ह्यातील निवडक पाच मतदारांना मतदार ओळखपत्राचे वाटप व उत्कृष्ट काम करणारे अधिकारी यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पूजा सेंदुरकर, द्वितीय क्रमांक यामिनी देशमुख व तृतीय क्रमांक प्रज्वल राखडे यांनी पटकावला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. भोजराज श्रीरामे व आभार प्रदर्शन तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. भीमराव पवार, डॉ. जितेंद्र किरसान, डॉ. रोमी बिष्ट व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी तथा कर्मचारी, जे.एम. पटेल महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते.
???????????????????