London Escorts sunderland escorts 1v1.lol unblocked yohoho 76 https://www.symbaloo.com/mix/yohoho?lang=EN yohoho https://www.symbaloo.com/mix/agariounblockedpvp https://yohoho-io.app/ https://www.symbaloo.com/mix/agariounblockedschool1?lang=EN
Wednesday, November 6, 2024
HomeUncategorizedमतदार संख्येत प्रथम क्रमांकावरील नागपूर मतदानात सर्वात शेवटी

मतदार संख्येत प्रथम क्रमांकावरील नागपूर मतदानात सर्वात शेवटी

नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात मतदार संख्येत पहिल्या क्रमांकावर (१६४८०) असलेला नागपूर जिल्हा मतदान टक्कवारीत (८१.४३ टक्के) सहा जिल्ह्यात सर्वात शेवटी आहे. दरम्यान एकूण विचार करता निवडणुकीत झालेले ८६.२३ टक्के मतदान निवडणूक पूर्व अंदाज चुकवणारे ठरण्याची शक्यता आहे.

शिक्षक मतदार संघात एकूण ३९ हजार ४०६ मतदार आहेत. यापैकी एकूण ३४ हजार ३४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. टक्केवारीचा विचार करता नागपूर जिल्हा सर्वात शेवटी आहे. गडचिरोली जिल्ह्यात १८ मतदान केंद्रांवर ९१.५३ टक्के मतदान झाले. नागपूर जिल्ह्यामध्ये ४३ मतदान केंद्रांवर ८१.४३ टक्के मतदान झाले . भंडारा जिल्ह्यात १२ मतदान केंद्रांवर ८९.१५ टक्के मतदान झाले. गोंदिया जिल्ह्यातील १० मतदान केंद्रांवर ८७.५८ टक्के मतदान झाले. वर्धा जिल्ह्यात १४ मतदान केंद्रावर ८६.८२ टक्के मतदान झाले . चंद्रपूर जिल्ह्यातील २७ मतदान केंद्रांवर ९१ .५३ टक्के मतदान झाले.नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात एकूण ३९ हजार ४०६ मतदार आहेत. यात २२ हजार ७०४ पुरुष तर १६ हजार ७०२ महिला मतदारांचा समावेश आहे. पैकी आज एकूण ३४ हजार ३४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात २० हजार ६६३ पुरुष तर १३ हजार ६८६ महिला मतदारांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ३ हजार २११ मतदार असून आज ५६३ महिला आणि २ हजार ३७६ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.नागपूर जिल्ह्यामध्ये शिक्षकमतदारांची एकूण संख्या १६ हजार ४८० असून आज ७ हजार ८२ महिला आणि ६ हजार ३३८ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भंडारा जिल्ह्यात एकूण ३ हजार ७९७ मतदार असून आज १ हजार ५३ महिला आणि २ हजार ३३२ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.गोंदिया जिल्ह्यात एकूण ३ हजार ८८१ मतदार असून आज ९८९ महिला आणि २ हजार ४१० पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ७ हजार ५७१ मतदार असून आज २ हजार ३८८ महिला आणि ४ हजार ५६९ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वर्धा जिल्ह्यात एकूण मतदार संख्या ४ हजार ८९४ असून आज १ हजार ६११ महिला आणि २ हजार ६३८ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयातून मतदान पेट्या नागपूर येथील अजनी परिसरातील समुदाय भवनातील स्ट्राँगरुमकडे रवाना झाल्या आहेत.तेथे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. २ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ८ वा. पासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे.

- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES

Yvvvvyyb

Bajajan

spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

तर पक्षातून बंडखोरांना बाहेर काढण्याचे कामसुद्घा होईल विजय वडेट्टीवार..

✍️गडचिरोली :निवडणुकांचे बिगुल वाजलं असून विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता...

गडचिरोलीतून डॉ.मिलिंद नरोटे भाजपचे उमेदवार

मुबई : विधानसभा निवडणुकीसाठी घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून याद्या जाहीर करण्याचा धमाका सुरू झाला त्यानंतर आता महायुतीतून भाजपकडून दुसरी यादी जाहीर झाली आहे....

Recent News

Most Popular

Recent Comments